ऑर्वेल आणि गोलान्झ


ललित, दिवाळी अंक २०२०

‘डाउन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन’ हे जॉर्ज ऑर्वेलचं पहिलं प्रकाशित पुस्तक. ते 9 जानेवारी 1933 रोजी लंडनमधल्या ‘व्हिक्टर गोलान्झ लिमिटेड’ या प्रकाशनसंस्थेतर्फे प्रसिद्ध झालं. ऑर्वेल त्या वेळी 29 वर्षांचा होता. त्यानंतर 46व्या वर्षी झालेल्या त्याच्या निधनापर्यंत त्याची आणखी तेरा पुस्तकं प्रसिद्ध झाली. या एकूण चौदा पुस्तकांतली सात पुस्तकं याच गोलान्झ प्रकाशनसंस्थेकडून आली. या पुस्तकांच्या प्रकाशनाचा इतिहास आणि ऑर्वेलचं त्या काळातलं जगणं यांविषयीची रोचक माहिती त्याच्या पत्रांतून आणि चरित्रांतून वाचायला मिळते.

जॉर्ज ऑर्वेल हे एरिक ब्लेअर याने त्याच्या या पहिल्या पुस्तकासाठी घेतलेलं टोपणनाव होतं. सहाच वर्षांपूर्वी ब्लेअरने आपल्या इंडियन इंपिरियल सर्व्हिसच्या बर्मा विभागातल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. बर्मातल्या पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात ब्रिटिश वसाहतवाद आणि त्यांचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार या दोन्ही गोष्टींविषयी त्याच्या मनात तीव्र तिरस्कार निर्माण झाला होता. अशा चाकरीत पाच वर्षं काढल्याचा जणू पश्चात्ताप म्हणून घरी परत आल्यावर काही काळ त्याने सामाजिक दृष्ट्या तळाशी असलेल्या लंडनमधल्या भटक्यांसोबत, त्यांच्यातला एक होऊन काढला. दोन वर्षं तो पॅरिसमधल्या कष्टकर्‍यांच्या वस्तीत जाऊन राहिला. तिथे एका उंची हॉटेलच्या किचनमध्ये त्याने डिश-वॉशिंगसहित हरकाम्या म्हणून काम केलं. या सर्व अनुभवांवरचं त्याचं लेखन जोनाथन केप आणि फेबर अँड फेबर या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थांनी नाकारलं, तेव्हा निराश झालेल्या ब्लेअरने ते मेबल फिअर्झ या त्याच्या लंडनमध्ये राहणार्‍या मैत्रिणीकडे नष्ट करायला पाठवलं. तिने ते लिओनार्ड मूर नावाच्या तिच्या ओळखीच्या एका साहित्यिक एजंटकडे पाठवलं आणि मूरने ब्लेअरला व्हिक्टर गोलान्झ हा प्रकाशक मिळवून दिला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , दिवाळी अंक २०२०
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Yogesh Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    जयप्रकाश जी, अतिशय माहितीपूर्ण आणि रोचक लिखाण! Orwell च्या आयुष्यात डोकावून बघायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद! Animal Farm आणि 1984 च्या genesis बद्दल समजून घ्यायलासुद्धा नक्कीच आवडेल. वाट बघतोय!

  2. Shrikant Pawar

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख वाचतोय, बहुविध चं सभासदत्व घेतल्याचा निर्णय घेतला ते योग्यच झाल, असं येथील लेख वाचताना वाटलं



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen