अंक : ललित दिवाळी २०२०
सुमारे साडेपाच दशकांपूर्वीची गोष्ट. किंग्जसर्कलच्या सेवाभारती संस्थेतील संध्याकाळ. कवी यशवंतांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन रंगलं होतं. शांता शेळके, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर यांसारखे मान्यवर कवी उपस्थित होते. माझी आई पद्मिनी बिनीवालेदेखील होती. तिथे मी विंदांना प्रथम बघितलं. दहा वर्षांची मी आणि माझा धाकटा भाऊ अरविंद उत्सुकतेनं पहिल्या रांगेत बसलो होतो. अनेक कविता डोक्यावरून जात होत्या पण विंदांनी, ‘धोंड्या न्हावी चहा न घेई चक्रम/आहार त्याचा भक्कम’ ही कविता म्हणताच वाटलं, हा माणूस गोष्ट सांगणारा कवी दिसतो आहे. कवितांची दुसरी फेरी सुरू झाली. अरविंद कंटाळला. त्यानं मोठ्ठी जांभई दिली. त्यानंतर परत विंदा कविता म्हणायला उठले. आमच्या सहनशीलतेची त्यांना कणव आली असावी. आमच्याकडे प्रेमानं पाहत ते म्हणाले, ‘‘इतका वेळ शहाण्यासारखं बसलेल्या या छोट्या मुलांसाठी मी आता एकदोन कविता म्हणणार आहे.’’ आम्ही सरसावून बसलो. आता विंदांचा आवाज बदलला. म्हणण्याची ढब बदलली. डोळे विस्फारले. आता ते आमचे दोस्त बनले. विंदा म्हणजे जादूच्या अंगठीतला प्रेमळ राक्षसच वाटले. त्यांच्या दोन कवितांपैकी एक आठवते ती त्यातल्या ‘अलल् डुर्र’ या मजेदार शब्दामुळे. ही कविता भीम आणि बकासुराची होती. त्यांची कविता संपताच आम्ही दोघांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. तेव्हा कल्पनाही नव्हती की आणखी आठ-दहा वर्षांनी मी त्यांची विद्यार्थिनी होणार होते...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मंदार केळकर
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख। पण मधले अनेक शब्द नीट वाचता येत नाहीयेत, font चा प्रॉब्लेम असावा