अंक : ललित दिवाळी २०२०
एक
‘एके दिवशी सकाळी ग्रेगॉर सॅम्सा जेव्हा अस्वस्थ करणार्या स्वप्नातून जागा झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं रूपांतर एका प्रचंड आकाराच्या किळसवाण्या किड्यामध्ये झालं आहे,’ - फ्रांझ काफ्काच्या ‘मेटामोर्फोसीस’ या लघु-कादंबरीतल्या या पहिल्या वाक्याइतकंच विचित्र आणि विलक्षण काय असू शकेल ?...तर ते आहे, मुराकामीच्या ‘सॅम्सा इन लव्ह’ या कथेतील हे पहिलं वाक्य- ‘तो जागा झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं (मनुष्यप्राण्यात) रूपांतर झालं आहे आणि तो ग्रेगॉर सॅम्सा झालाय.’ आता बोला!
तुम्ही जर हारुकी मुराकामी या श्रेष्ठ जपानी लेखकाची ‘सॅम्सा इन लव्ह’ ही कथा वाचली असेल तर या कथेचं मूळ आणि यातील व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी तुम्ही फ्रांझ काफ्काची ‘मेटामोर्फोसीस’ ही लघुकादंबरी वाचायला हवी. आणि तुम्ही जर काफ्काची ही साहित्यकृती आधी वाचली असेल तर मग मुराकामीच्या सॅम्साची गोष्ट वाचताना एक भन्नाट ‘सिक्वेल’ वाचल्याचा आनंद तुम्हाला मिळू शकेल. या दोन्ही साहित्यकृती स्वतंत्रपणे वाचायलाही हरकत नाही, पण काफ्का आणि मुराकामी यांचं हे साहित्य क्रमाने लागोपाठ वाचणं, हा ज्यांनी याआधी या दोघांचं काहीच वाचलं नाही, त्यांच्यासाठी उच्च प्रतीचा बौद्धिक अनुभव ठरू शकतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .