fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

सर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा

मेंदू, मन आणि मनगट यांचा समतोल साधणाऱ्या शिक्षणातून निरोगी व्यक्तिम­त्त्वाची जडणघडण होते, हे जाणून पुण्यातील अक्षरनंदन शाळेने आपल्या मुलांसाठी सर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळांचा उपक्रम राबवला. या शाळेतील शिक्षक अरुंधती तुळपुळे या कार्यशाळांविषयी सांगतायत –

————————————————————————————–

शिकण्याच्या प्रक्रियेत बुद्धी, हात आणि हृदय (मन) एकत्रितपणे काम करत असतील तर तो अनुभव आनंदाचा आणि अधिक काळासाठी लक्षात राहणारा ठरतो. शाळेत शिकताना मुलांना हाताने काम करण्याचे, निर्मिती करण्याचे, सर्जनशीलता वापरण्याचे अनुभव मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्या कामात हेतू समजून घेऊन ते उत्तम प्रकारे पूर्ण करताना करावे लागणारे कष्टही समाधान देणारे असतात याचा प्रत्यय मुले घेऊ शकतात. त्यातून श्रमाला पुरेशी प्रतिष्ठा देण्याची मानसिकता निर्माण होऊ शकते.

बालवाडीपासूनच विविध विषयात असे अनुभव मुलांना शाळेत मिळत असतात. शेती, स्वयंपाक, वैज्ञानिक प्रयोग, स्वच्छता, अशा नियमित उपक्रमातूनही काही गोष्टी मुलांपर्यत पोहचवायचा प्रयत्न असतो. आठवीच्या टप्प्यावर मुलांची ताकद चांगली वाढलेली असते. नवनवीन गोष्टी करून बघण्याची, त्यातून शिकण्याची त्यांची बौद्धिकक्षमताही झपाट्याने विकासित होत असते. म्हणून आठवीसाठी  ‘कार्यशाळा’ हा वर्षभराचा उपक्रम घेतला जातो. शाळेच्या सुरूवातीपासूनच पाबळ येथील विज्ञानकेंद्राशी व डॉ. कलबाग यांच्या कामाशी आपला परिचय होता. सुरुवातीची काही वर्षे मुलांचे दोन – तीन दिवसांचे शिबीर पाबळला होत असे. तिथे मुले प्रत्यक्ष कामात सहभाग घेत असत. विज्ञानकेंद्राने ग्रामीण भागातील शाळामधून IBT (Introduction to Basic Technology) राबवायला सुरुवात केली. आठवी ते दहावी असा तीन वर्ष चालणारा अभ्यासक्रम असून शालान्त परीक्षेसाठी तो घेता येतो. या अभ्यासक्रमातून प्रेरणा घेऊन व विज्ञानकेंद्राचे मार्गदर्शन घेऊन आपल्या शाळेत इयत्ता आठवीसाठी  ‘कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. शहरातील तज्ञांची उपलब्धता आणि जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन दर आठवड्यातील अर्धा दिवस असा पूर्ण वर्षाचा उपक्रम ठरवला. मुले सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा तीन विभागात काम करतात.

या कार्यशाळांमधून मुलं प्रत्येक विभागातील काही मूलभूत संकल्पना व कौशल्ये शिकतात. सुतारकामातून काही खेळणी, उलथणी, कीचेन्स, पाट, पॅड्स, चावी टांगणाळे, शेल्फ, स्टूल अशा विविध वस्तू बनवतात. इलेक्ट्रिकल वायरिंग शिकून स्विचबोर्ड बनवणे, टयूब बसवणे extension board तयार करणे, दिव्याची माळ बनवणे अशी कामे शिकतात. सोल्डरिंग

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu