जीवनभाषेतून शिक्षण

“…शाळेत बालवाडी ते दुसरी या टप्प्यावर सगळ्या मुलांना जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न करावा, कारण त्याच्याइतकं भाषेशी भिडण्याचं प्रभावी साधन नाही. मात्र शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की, कोणताही अनुभव देण्यामागे कोणतं शैक्षणिक प्रयोजन आहे? मंडईत सहल नेली तर तिथे मूल काय- काय शिकणार आहे? मुळात पालकांचे बोट सोडून एवढ्या गर्दीत शिस्तीनं जायचं झालं तर काय करावं लागेल? नंतर मग मंडईत भाज्यांचे प्रचंड ढीग, त्यांचे रंग, वास, चव, आकार आणि पाहणे, गंध घेणे या संवेदना तीक्ष्ण कशा होतील हे बघता यईल. भोवतालाचे काळजीपूर्वक निरीक्षण करता येईल. मग या सगळ्या गलबलाटात अनेक शब्द सापडतात. हळद, कुंकू, रांगोळ्यांचे रंग, नारळाचं तोरण, बाशिंग, होमकुंड, मंडईची दगडी कौलारू इमारत, महात्मा फुले मंडई, महात्मा फुले कोण, पिवळीधम्मक लिंबे, हिरवीगार कोथिंबीर, लालबुंद टोमॅटो, वाटोळा भोपळा,  हे बघताना रसरशीत, टवटवीत, टपोरे असे शब्द कुठून कुठून सांडतात…” पुण्यातील ‘अक्षरनंदन’ शाळेच्या संस्थापक – सदस्य आणि कथालेखिका वंदना भागवत आपल्या शाळेतील अनुभवाधारित शिक्षणपद्धीचे अनुभव सांगतायत – 

————————————————————————————-

बाहेर पाऊस सुरू होतो. बालवाडीची मुलं बघत असतात. पहिल्यांदा टप् टप् आवाज येत असतो. तो वाढतो. मग थडथड वाजायला लागतो. मग धो धो पडायला लागतो. मग थोडा कमी होतो. आणखी थोडा. रिमझिम पडायला लागतो. ‘ झिळमिळ पाण्याचा रंग. पाण्यानं केलं छुत छुत छुत… ’ मुलांना आरती प्रभूंची कविता म्हणायला आवडते.  मग ‘ भुताने लावला झाडाला हात. झाडांचे झाले पोपट सात …’ असं म्हटलं की मुलांचे डोळे विस्फारतात. झाडांचे पोपट होतात म्हणजे झाड पाण्यानं भिजून हिरवी होतात. असं सांगितलं की मुलांचे डोळे चमकतात. मग पाऊस थांबतो. ताई विचारतात, ‘मुसळधार पाऊस’ म्हणजे काय? मुसळ म्हणजे काय? अशा गप्पा सुरू होतात. मुसळ, उखळ, कुसळ, अशा शब्दांचा खेळ सुरू होतो.

अन्नपदार्थांविषयी बोलताना मुलांना सोबत घेऊन ताई भेळ करतात. आंबट म्हणजे काय? हे प्रत्यक्ष चवी चाखवून विचारतात. लिंबू, कैरी, आमसूल, चिंच. मग आंबट, तिखट, चटकदार असे शब्द पटापट बाहेर पडतात. हे सोपं कारण प्रत्यक्ष चव घेऊन मुलं सांगतात. शांता शेळकेंची ‘वेडबंबू शंभू बाजारात गेला, फुलांच्या बदल्यात नाक देऊन आला’ ही कविता मुलांच्या भावनात्मक आकलनाला आणि कल्पनाशक्तीला आव्हान देणारी. ‘वेडबंबू म्हणजे काय रे?’ असा प्रश्न ताई विचारतात. मुलं अनेक पर्याय देतात. चुकीचं वागणारा, वेडपट, काहीच कळत नाही असा. पण मग हेही सांगतात की ‘वेडबंबू’ लाडानं म्हणतात. खरा खरा वेडा नसतो तो. ‘फुलांच्या बदल्यात नाक कसा देईल?’ या प्रश्नांशी मुलं फार मजेत झुंजतात. तीच गंमत पुढच्या वेळेस ‘लळा’ शब्दाचा अर्थ शोधताना येते. कृतिशील भाषेतून विकास घडत – घडत बालवाडीच्या एका टप्प्यावर मूल अलगद अमूर्त भावर्थांकडे जाते. नवीन विचार करायला लागते. जीवनभाषेशी जोडलेलं अनुभवविश्व त्याला आत्मविश्वासानं भाषेत हुंदडायला देतं.

शाळेत बालवाडी ते दुसरी या टप्प्यावर सगळ्या मुलांना जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न करावा, कारण त्याच्याइतकं भाषेशी भिडण्याचं प्रभावी साधन नाही. मात्र शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की, कोणताही अनुभव देण्यामागे कोणतं शैक्षणिक प्रयोजन आहे? मंडईत सहल नेली तर तिथे मूल काय- काय शिकणार आहे? मुळात पालकांचे बोट सोडून एवढ्या गर्दीत शिस्तीनं जायचं झालं तर काय करावं लागेल? नंतर मग मंडईत भाज्यांचे प्रचंड ढीग, त्यांचे रंग, वास, चव, आकार आणि पाहणे, गंध घेणे या संवेदना तीक्ष्ण कशा होतील हे बघता यईल. भोवतालाचे काळजीपूर्वक निरीक्षण करता येईल. मग या सगळ्या गलबलाटात अनेक शब्द सापडतात. हळद, कुंकू, रांगोळ्यांचे रंग, नारळाचं तोरण, बाशिंग, होमकुंड, मंडईची दगडी कौलारू इमारत, महात्मा फुले मंडई, महात्मा फुले कोण, पिवळीधम्मक लिंबे, हिरवीगार कोथिंबीर, लालबुंद टोमॅटो, वाटोळा भोपळा,  हे बघताना रसरशीत, टवटवीत, टपोरे असे शब्द कुठून कुठून सांडतात.

संबंधित लेखः-

गोष्ट रचनावादाची!

कुटुंबाचे अंदाजपत्रक

भाज्यांचे वर्गीकरण होते. कंदभाज्या, फळभाज्या, वेलभाज्या, गणिताच्या संकल्पनाही समोर येतात. पूर्ण भोपळा, अर्धा भोपळा, एक किलो, अर्धा किलो, अडीच किलो, अडीचशे ग्रॅम या सगळ्यांची वजने असतात. पाच किलोचे पण वजन असते. बटाट्यांच्या पोत्यांचे वजन करायचे वजनकाटे वेगळे असतात. तिथे शंभर किलोचे वजन होऊ शकते. शाळेत गेल्यावर मटार उसळ करायची असते. त्यासाठी आठ किलो मटार घ्यायचा असतो. तेव्हो दोन किलोचे माप किती वेळा वापरले यावर बोलणे होते. मग पुढचा अभ्यास पत्रावळी, द्रोण, केळीची पाने यांच्या दुकानात. पानांना काटे कसे लावलेले असतात, थर्मोकोल, कागदांच्या ताटल्यांपेक्षा पत्रावळ्या, द्रोण का वापरायच्या…. वगैरे. मग वाढदिवसाला पत्रावळ्या

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. nishak

    अतिशय अप्रतिम व विचार प्रवर्तक लेख आहे.भाषेतील इतर विषयातील शिकण्यातील विचार खूपच प्रभावी आहेत.प्रमाण भाषे संबंधी अनाठाई भीती व श्रेठत्व कमी होईल.

  2. Rdesai

    सुंदर माहिती

  3. jgajanan

    छान मांडणी

Leave a Reply