"इयत्ता आठवीला इतिहास शिकवत असताना माझ्याकडे चौतीस वर्गसंख्या असलेला ‘क’ तुकडीचा वर्ग होता. 'इतिहासाची रचना करताना प्रत्यक्ष पुरावे आणि पुराव्यांचा अभ्यास केला जातो' हे वाक्य पुस्तकात होतं. या चौतीसपैकी एकाही विद्यार्थ्यांने वस्तुसंग्रहालय पाहिलेलं नव्हतं आणि घरचे त्यांना रविवारी नेतील अशी शक्यताही नव्हती. त्यानंतर लगेच दिवाळीची सुट्टी लागणार होती. मी मुलांना घरातले जुन्यात जुने फोटो, लग्नपत्रिका शोधून आणायला सांगितलं. माझ्या या वानरसेनेने १९२० वगैरे तारखा असलेली भांडी आणली होती." आपल्या वर्गातील एका वेगळ्या उपक्रमाविषयी सांगतायत कांचन जोशी -
-------------------------------------------------------------------------------------------
गेले वर्षभर शिक्षण विभागातून गुणवत्ता विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली. भरपूर शिक्षकांशी बोलणे, चर्चा करणे, प्रशिक्षण देणे, मोड्युल्स तयार करणे, पाठ्यपुस्तक रचनेत सामील होणे यांसारख्या अनेक प्रक्रियांमध्ये सामील होता आले. गेल्या आठ-दहा वर्षात शिक्षणाच्या संकल्पनेत बराच बदल होतोय, पण या दोन-तीन वर्षात मात्र शिक्षणक्षेत्रातील योग्य दिशेने व वेगाने होणाऱ्या गुणवत्ता विकासाच्या ध्यासाने तो बदल सार्वत्रिक होताना दिसतोय हे नक्की!
संबंधित लेखः-
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
गोष्ट रचनावादाची!
मराठी प्रथम
कांचन जोशी
2019-12-05 10:00:00
patankarsushama
6 वर्षांपूर्वीवेगळी माहिती मिळाली
Rdesai
6 वर्षांपूर्वीछान !