नरहर रघुनाथ फाटक(१५ एप्रिल १८९३- २१ डिसेंबर १९७९) हे चरित्रकार आणि इतिहास संशोधक होते. प्रचलित विचारप्रवाहांविरुद्ध मतप्रदर्शन करुन वाद निर्माण करणे हे त्यांच्या अनेक लेखांचे वैशिष्ट्य होते. विविधज्ञानविस्तार, विविधवृत्त, चित्रमयजगत इत्यांदीमधून त्यांनी सातत्याने लिहिले. लोकमान्य टिळक, नाट्याचार्य खाडीलकर यांची चरित्रे त्यांनी लिहिली. इतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी इतिहासाच्या प्रेमापेक्षा इतिहासाचे कठोर समीक्षण करण्यावर अधिक भर दिला होता. प्रस्तुतचा, विविधवृत्तच्या १९५६च्या दिवाळी अंकातून घेतलेला लेखही त्याच पठडीतला आहे. या लेखाच्या शीर्षकात परराष्ट्रीय असा शब्द असला तरी त्याचा अर्थ या लेखापुरता महाराष्ट्राबाहेरील असा आहे. तसा खुलासाही त्यांनी केलेला आहे. मराठ्यांकडे (म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडे) लढाऊ वृत्ती होती, पराक्रम होता परंतु सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय हुषारी आणि समज नव्हती. इंग्रजांनी नेमलेले वकील आणि मराठ्यांचे वकिल यांच्यातील तुलना यापुरता लेखाचा विषय असला तरी त्याचा निष्कर्ष मात्र व्यापक अर्थाचा आहे. हा लेख वाचल्यावर आपण आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठी नेतृत्वातले हे खुजेपण आजही कायम असल्याचे आपल्या लक्षात येते. अंक: विविधवृत्त, दिवाळी १९५६ ********** मराठ्यांचे परराष्ट्रीय राजकारण हे शब्द जरी विशाल अर्थाचे दिसले तरी आरंभीच सांगून टाकणे अवश्य आहे, की त्या शब्दाचा व्याप हिंदुस्थानापुरताच आहे. मराठ्यांचे वर्चस्व हिंदुस्थानभर होते, पण साऱ्या देशांत त्यांची राज्यसत्ता नव्हती. मराठ्यांचे वर्चस्व गरजेप्रमाणे मानणारी, परंतु अगदी स्वतंत्र अशी मराठेशाहीच्या जोडीने
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, राजकारण
, विविधवृत्त
, पुनश्च
इतिहास
ghansham.kelkar
5 वर्षांपूर्वीनेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख
MaheshKhare
6 वर्षांपूर्वीआपले पूर्वज परदेशी प्रवास करत असत असे म्हणतात. पण नंतर कधीतरी त्यावर बंदी घालण्यात आली. यामुळे आपल्या लोकांची नवे ज्ञान मिळवण्याविषयीची चौकसबुद्धी कमी होत गेली असावी. या उलट स्थिती युरोपीय लोकांची असावी. हा लेख वाचून समुद्रप्रवासावर बंदीचा मूर्खपणा आपल्यात कधी व कसा आला असावा याबद्दल कुतुहल निर्माण झाले.