अंक – मराठी ग्रंथसंग्राहक, ऑगस्ट १९४६ मराठी साहित्यांतील एक चिकित्सक व व्यासंगी वृत्तीचे संशोधक म्हणून श्री. प्रियोळकर यांचा लौकिक आहे. प्रस्तुत लेखांत ग्रंथसंग्रह करण्याचे विविध दृष्टिकोण व मार्ग यांचे महत्त्व त्यांनी वर्णन करून सांगितले आहे. मराठी ग्रंथालय संघाच्या विद्यमाने ‘पंचारती’ म्हणून जे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध करण्यांत आले आहे; त्यांतील लेखांतून हा उतारा निवडण्यांत आला आहे. ********** ग्रंथसंग्राहकाला आणखी अनेक दृष्टींनी आपल्या आवडीप्रमाणे संग्रह करतां येईल. त्यांपैकी होतकरून संग्रहकाच्या मार्गदर्शनाकरिता कांही दृष्टिकोण सांगतो. हस्तलिखिते- यांत प्राचीन व अर्वाचीन असे भेद आहेत. १९व्य शतकाच्या पूर्वीची काव्ये व बखरी व इतर कागदपत्र यांना प्राचीन असे म्हणता येईल. यापैकी स्वतः कवीच्या हातची अशी विरळाच सांपडतात; पण स्वतः कवींची हस्तलिखितें नसली तरी कवीच्या काळाला जवळ अशी हस्तलिखिते मिळाली तरी त्यांनाही फार महत्त्व आहे. मुद्रणकला अस्तित्वांत आल्यानंतर स्वतः लेखकाच्या हातच्या लिखितांनाच महत्त्व राहिले आहे. उदाहरणार्थ गीतारहस्याचे टिळकांच्या हातचे मूळ हस्तलिखित कोणत्याही ग्रंथसंग्रहालयाला बहुमोल असा ठेवाच वाटेल. त्यांत आधुनिक प्रसिद्ध लेखकाचे एकादे हस्तलिखित जर अप्रकाशित असले तर त्याचे महत्त्व विशेष आहे. हे निराळे सांगण्याचे कारण नाही. दादोबा पांडुरंग यांच्या “माबाईच्या ओव्या” हे अशांपैकी एक हस्तलिखित आहे. व्यक्तिविशिष्टसंग्रह- म्हणजे एकाद्या ग्रंथकाराचे सर्व मुद्रित ग्रंथ किंवा लेख गोळा करणे, यांत स्वतः ग्रंथकाराच्या कृतीप्रमाणे त्याच्यासंबंधी लिहिलेले ग्रंथ किंवा मासिके किंवा वृत्तपत्रे यांमध्ये प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .