चूक सुधारुया


सुट्या पडल्या की, ऋतुमान कुठलंही असो त्याला न जुमानता लोकं मुलाबाळांसह पर्यटनस्थळी गर्दी करतात. दिल्लीवारी ठरली की बहुधा मंडळी अमृतसरला भेट देतात. अमृतसर म्हटलं की, सुवर्ण मंदिर, जालियांवाला बाग ह्या गोष्टी आल्याच. मात्र तेथून जवळच असलेल्या आणि आपल्या संत नामदेवामुळे पावन झालेल्या घुमानकडे जावं असं अजूनही आपल्याला वाटत नाही. वास्तविक नामदेवाच्या रचना शिखांच्या ग्रंथसाहिबमध्ये अंतर्भुत आहेत. इतका हा आपला मराठी माणूस त्यांच्याकडे एकरूप झाला. पण अजूनही किती मराठी माणसाना हे ठाऊक आहे? माहित असून किती जण घुमानला भेट देतात? हां, मात्र अमृतसर म्हटलं की वाघा वा बाघा बॉर्डरला जाणं आलच. तेथे गेल्यावर ज्याच्या त्याच्या मापाप्रमाणे त्याची छाती राष्ट्रप्रेमाने, विशेषतः पाकिस्तानच्या झेंड्याकडे खुन्नसपणे पहात फुलते, असं तेथे आपोआप वातावरण होतच... बाघा बॉर्डरचं सगळं वातावरणच असं भारलेलं असतं, पण ह्यात आपण एक मोठी चूक करत आलो आहोत हे लक्षात आलं काय? होय, मोठी चूकच! ही चूक लक्षात येण्यास कारणीभूत झाले ते प्रविण कारखानीस यांचा ‘ईशान्य वार्ता’ मालिकेतील लेख. ह्या लेखाचं शिर्षक आहे – ‘बाघा बॉर्डर न म्हणता – अटारी बॉर्डर म्हणा.’ ते कां हे सांगतांना ते म्हणतात, ‘अमृतसरपासून अवघ्या काही अंतरावर ‘अटारी’ या नावाचे छोटेसे रेल्वे स्थानक आहे. जे भारताच्या सरहद्दीवर असून त्या स्थानकापासून काही अंतरावर पाकिस्तानची सरहद सुरू होते. आणि लगेचच पाकिस्तानचे वाघा रेल्वे स्थानक येते. त्याचप्रमाणे अमृतसर शहरातून जाणारा श्यामसिंह अटारी मार्ग पुढे भारतीय सरहद्दीच्या ज्या ठिकाणी संपतो त्या भागाला अटारी हेच नाव आहे. अटारी याच नावे आपले चेक पोस्ट आहे.’ मग पुढे कारखानीस लिहितात, ‘तिथून ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


रविप्रकाश कुलकर्णी , पुनश्च

प्रतिक्रिया

  1. satishk

      5 वर्षांपूर्वी

    झोंबी या आनंद यादव यांच्या नाण्याची दुसरी बाजू अंगणातले आभाळ यशवंत पाठक

  2. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    वरील लेखात प्रत्येक ठिकाणी काय म्हणायचे हे समजत नाही स्पष्ट:ता नाही

  3. mukundmk

      5 वर्षांपूर्वी

    वाः ! मस्त लेख ! आजच वाचला म्हणून आत्ता कळवले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen