आईन्स्टाईनची खोली - भाग १


अंक - अंतर्नाद - जानेवारी, २०१४ अमेरिकेला पहिल्यांदा गेल्यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षांनी, म्हणजे १९८१  मध्ये शेवटी योग जुळून आला. जाण्यापूर्वी ठरवलं होतं, की गेल्यावर शक्यतो सर्वप्रथम करायचं म्हणजे प्रिन्स्टनमधील आईनस्टाइन राहात ते घर, आणि तिथल्या इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमधील त्यांची अभ्यासाची खोली या दोन गोष्टी पाहायच्या. आईनस्टाइन म्हणजे माझं दैवत. ज्यूद्वेष्टी नाझी जर्मनी सोडल्यास सार्‍या जगाला वंदनीय असलेली व्यक्ती. त्यांचं वास्तव्य असलेल्या या दोन जागा म्हणजे माझ्या मनातील तीर्थस्थानं  होती, पण या जागांना प्रत्यक्ष भेटीचा योग येत नव्हता, हेच खरं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य अगदी सारी अमेरिका पालथी घातली. त्या काळात तिकडे येणार्‍या मित्रांना अमेरिकेतील कितीतरी ठिकाणं स्वत: नेऊन दाखवली. पण या सार्‍या धावपळीत माझं प्रिन्स्टन जाणं राहून गेलं. नाही जमलं. या दरम्यान न्यूयॉर्कला तर आठ-दहा फेर्‍या झाल्या असतील. न्यूयॉर्कहून प्रिन्स्टनला जायला दर अर्ध्या तासाने बस असे आणि सारा प्रवास दीड-दोन तासांचा. पण जाणं राहिलंच. चार-पाच वर्षांनी भारतात परत यायला अमेरिका सोडली. तेव्हा, परत येऊ त्यावेळी ते घर आणि ती खोली अगदी नक्की बघूच बघू असं ठरवलं, इतकंच. त्यानंतरही काही ना काही कामानिमित्त अमेरिकेला फेर्‍या झाल्या. न्यूयॉर्कलापण आठवडा-आठवडा असं चार-पाच वेळा राहिलो; पण दरखेपेला शेजारीच असलेलं प्रिन्स्टन मात्र चुकत होतं. मनाची रुखरुख कायम राहत होती. शेवटी एका अमेरिकाभेटीत न्यूयॉर्क सोडायच्या दिवशी अगदी अचानक सारं घडून आलं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , अनुभव कथन , स्थल विशेष , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. shripad

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख!

  2. modakad

      8 वर्षांपूर्वी

    "स्वत:बद्दल जरासुद्धा अहंभाव नसणं, हे फार थोर माणसांनाच जमू शकतं. बाकी आपण सारे जण स्वत:लाच बेगडी मोठेपण लावून मिरवतो आणि ते सार्‍या जगाला ठाऊक व्हावं म्हणून कायम प्रयत्नशील असतो." ... thanks a lot for sharing this article with us ! Keep up the good work !!

  3. Niranjan

      8 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख.

  4. dhampall

      8 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख , एवढ्या मोठ्या व्यक्तींचे असे विचार नक्कीच भारावून टाकणारे आणि शिकण्यासारखे आहेत . ????



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen