येत्या १२ जुलैला आषाढी एकादशी आहे. वारीचे कौतुक आणि विठ्ठल भक्तीचा महापूर आपण नेहमीच पाहतो, वाचतो आणि ऐकतो. परंतु त्या पलिकडे गेल्या काही वर्षात वारीचे अर्थकारण, व्यवस्थापन याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. यासंबंधीच्या प्रयत्नांविषयीचा हा अतिशय अभ्यासपूर्ण लेख- ********** अंक: अंतर्नाद, जुलै २०१२ पंढरपूरस्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाते. ते नुसते महाराष्ट्रातच प्रिय आहे असे नसून निकटवर्ती कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या राज्यांतील भाविकांनाही विठूराया पालवीत असतो. पंढरपूर हे नुसतेच धार्मिक क्षेत्र नसून ते एका समाजक्रांतीचे पीठही आहे. या समाजक्रांतीचे दोन उद्गार भारतात गाजलेले आहेत. हरिजनांच्या मंदिरप्रवेशासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात प्राणंतिक उपोषण करून एक अडथळा पार केला, तर विनोबाजींनी सर्व धर्मीयांसह मंदिरप्रवेश करून श्री विठ्ठलाला खऱ्या अर्थाने ‘विश्वदेव’ बनवले. वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपूरचे वैशिष्ट्य! शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच! वर्षभराचा विचार केला, तर अशाप्रकारे पंढरपूरला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या एक कोटीच्या आसपास जाते. इतक्या मोठ्या संख्येने येणारा ‘वारकरी’ हाच पंढरपूरचा केंद्रबिंदू आहे, हे उघड आहे. पंढरपुरात ज्या भक्तिसंप्रदायाचे प्रचलन आहे, तो ‘भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय’ या रूढ नावाने ओळखला जातो. खरे पाहिले तर, संप्रदाय शब्दात त्याला बांधणे चुकीचे आहे. कारण संप्रदाय म्हटला, की एक प्रवर्तक आला. संप्रदायाचे यम-नियम आले. विशिष्ट उपासना पद्धती आली व महत्त्वाचे म्हणजे प्रवर्तकाचे भक्तगण आले. पंढरपुरत यांतले काहीच आढळत नाही. त्यामुळे हा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
satishk
6 वर्षांपूर्वीअफाट वारकरी/भक्दतगण/दर्शनेच्छुंची संख्या हे मर्यादेच्या बाहेर झाले आहे. सर्वात सर्वात म्हणजेर्तीचे आयुष्य सौंदर्यपुर्ण राहण्याकरीता पादस्पर्श वधाचा अभीषेक त्वरीत बंद व्हावा.
AbhayJahtap
6 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण लेख आहे. आषाडी वारीसाठी येणारे बहुतांश वारकरी दर्शन घेत नाहीत. नगरप्रदक्षिणा, कीर्तन झाले कि परततात. त्यामुळे दर्शनाच करू शकणा-या भाविकांची संख्या व येणाऱ्या लोकांची संख्या याचा मेळ लागण्याची आवश्यकता वाटत नाही. १ मे वगैरे ला मुख्यमंत्र्यांस ध्वजारोहण वगैरे समारंभ असतात. त्यादिवशी शासकीय महापूजा करणे शक्य नाही
purnanand
6 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख. सुचविलेल्या मुलभूत सुधारणा झाल्याच पाहिजेत. यासंबधात नुकतीच एक बातमी वाचनात आली. काही गावे अशी आहेत कि वारी त्या गावातून गेली कि दुर्गंधी चे साम्राज्य पसरते. ती घाण काढायचे काम एका सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते निरलस पणे करतात. वास्तविक एक्खाद्या राष्ट्रीय आपत्तीच्या असे काम करणे वेगळे.अशावेळी वारकर्यांच्या एखाद्या गटानीच हे काम करावे हे बरे.असे वाटते.
bookworm
6 वर्षांपूर्वीक्या बात! पंढरपूर शहर व वारी या विषयावर इतकं तर्कशुद्ध व सखोल लिखाण वाचलं नव्हतं. एलिझाबेथ एकादशी चित्रपटाच्या निमित्ताने लोकसत्तेत एक लेख आला होता. पंढरपूरच्या बाहेरील लोकांना हे सर्व पटेल यात शंका नाही पण स्थानिकांची बाजू काय असेल?त्यांना सुधारणेचे वावडे नसावे. मला इथे सरकारी खाक्या आड येताना दिसतो...