अभिजात भारतीय साहित्य, कला, चित्रपट संस्कृती जपायची असेल तर छोट्या छोटया समविचारी लोकांनी एकत्र येऊन अभिवाचन, प्रयोग, चित्रपट प्रदर्शन आणि त्यावर चर्चा करणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. त्यातूनच तरुण पिढीपर्यंत हा वारसा पोचू शकतो. याच विचारातून ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादिका डॉ वसुधा सहस्त्रबुद्धे आपल्या ठाणे येथील घरातच 'शब्दरंग' या वाचनप्रेमी मंडळीच्या वतीने दरमहा विविध लेखकांच्या कलाकृतींचे समूहवाचन करण्याचा उपक्रम राबवत असतात. श्रेष्ठ उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी . "मंटो हाजीर हो", हा एक छोटेखानी कार्यक्रम त्यांनी अलिकडेच केला होता आणि त्याला तीस ते पस्तीस मंटोप्रेमींनी, साहित्यप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या चर्चा, त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, अशा छोट्या कार्यक्रमांची आणि त्यांना एकत्र बांधून ठेवू शकणाऱ्या डिजिटल माध्यमांची गरज अधोरिखित झाली. मंटोची ओळख नुख्यतः आहे ती कथालेखक म्हणून. परंतु नाटकांमधूनही त्याने त्याच ताकदीने आपल्याला अस्वस्थतेचा अनुभव दिला आहे. त्याच्या नाट्यलिखाणाचा परिचय व्हावा म्हणून यावेळी त्याच्या 'इस मंझधार में', या स्त्री-पुरुष नात्याचे हळुवारपण जपणाऱ्या, स्त्रीच्या अथांग मनाचा ठाव घेणाऱ्या आणि पुरुषी अहंकाराची साचेबद्धता पुसून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाटिकेचे वाचन करण्यात आले. पहिल्या रात्रीचा अनुभव घेण्याआधीच अपघातग्रस्त होऊन विकलांग झालेला तरूण नवरा, प्रेम, कर्तव्य, नातेसंबध या तिढ्यात सापडलेली तरणी-सुंदर बायको, मुलाची आई आणि मुलाचा तरूण भाऊ यांची घालमेल. घरातील मोलकरणीच्या घुसमटीची त्याला मिळालेली जोड यातून हे नाट्य फुलते आणि अशा शेवटाला ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
बहुविध संकलन
, व्यक्ती विशेष
, व्हिडीओ
, मुक्तस्त्रोत
, साहित्य जगत
purnanand
6 वर्षांपूर्वीवा ! खूप सुंदर उपक्रम !प्रत्येक लेखकाच्या साहित्यावर असा कार्यक्रम होत असावा.छान