नियतकालिकांच्या जगात फेरफटका मारुन त्यातील रंजक, उद्बोधक, महत्त्वाचे असे निवडक काही थोडक्यात वाचकांना सांगणाऱ्या सदरातील हा नवा लेख. जून महिन्यात आलेली शेकडो नियतकालिके वाचून त्यातून ही माहिती निवडली आहे. अर्थात याशिवायही बरेच काही त्या त्या अंकांमध्ये असेल परंतु निवडकची प्रत्येकाची एक व्याख्या असते आणि कसोटीही असते. लेखकाला फेरफटका मारताना जे वेगळे वाटले त्याच्या या नोंदी- या सदरावर प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. काही अपेक्षा असतील तर त्याही मोकळेपणी सांगा. नक्कीच विचार करु. डॉक्टर ही पदवी फसवी आहे. वैद्यकिय उपचार करतो तो आपल्या नावामागे ‘डॉ.’ लावतो आणि जो संशोधन करुन प्रबंध लिहितो, त्याला पीएच्.डी. मिळते. तो पण आपल्या नावामागे ‘डॉ.’च लावतो! ह्या दोन प्रकारच्या ‘डॉ.’ मुळे काय गोंधळ उडतो हे ‘हॉटेल’ कादंबरीत नेमकेपणाने दाखवलं आहे. हे सांगायचं कारण डॉक्टर होण्यासाठी म्हणजे वैद्यकीय व्यवसायाचे शिक्षण घेताना शिक्षण काळात काय काय आणि कुठली पुस्तकं अभ्यासावी लागतात आणि त्याची तऱ्हा काय असते ह्याचा धांडोळा डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी ‘आणि ग्रंथोपजीविये’ – अजाणत्यांना डॉक्टर करणाऱ्या ग्रंथमादियाळीचं स्मरण या ‘महाअनुभव – जुलै २०१९’ अंकात खुमासदार पद्धतीने केले आहे. डॉ. अभ्यंकर लिहितात, वैद्यकीय शिक्षणात सलामीलाच गाठ पडते ती ‘ग्रेज अॅनाटोमी’ या बृहतग्रंथाची. याचा मुख्य फायदा असा, की हे पुस्तक घेताच आई-बापांना पोरगं अचानक लईच हुशार वाटायला लागतं. त्याच्या हातातला तो जाडजूड ग्रंथराज पाहताच त्यांचा उर भरुन येतो. शिवाय हे एका विषयाचे पुस्तक, अशी आणखी बरीच आहेत, ही भावना तर त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे करते. पण लवकरच पोराच्या असं लक्षात य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .