पाळंमुळं


अंक: निवडक कालनिर्णय मधून साभार मुंबईतील एका मित्राच्या घरी बसलो होतो. वेळ सकाळची होती. 'गुडमॉर्निंग अंकल' शाळेत जाण्याच्या तयारीत असलेली माझ्या मित्राची दोन अपत्ये, एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर आली आणि थोडा वेळ असल्यानं कोचावर बसली. मी नमस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना सहज विचारलं "कोणत्या शाळेत जाता तुम्ही?" मुलं उत्तरण्याच्या आतच माझा मित्र हसत म्हणाला "डोन्ट से शाळा. दॅट इज गावठी वर्ड. ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात. युनो माय व्यूज." खरंतर मित्राचे विचार मला माहित नव्हते. बऱ्याच वर्षांनी मुंबईत आमच्या गाठीभेटी होत होत्या पण विचार नाही तरी त्याचं चरित्र मला माहीत होतं. कवडीपासून कोटींपर्यंत अथवा झोपडीपासून प्रासादापर्यंत अशा छापाच्या ज्या कथा असतात त्यात त्याची चरित्रगाथा सहज सामावणारी होती. शिक्षण व भांडवल यांचा पुरेसा आधार नसताही आपल्या कर्तबगारीने तो आता एका कारखान्याचा मालक झालेला होता आणि सुखवस्तू म्हणता येईल असं जीवन जगत होता. मी काही उत्तरण्याच्या आतच मित्र पत्नीने चहाचं साहित्य आणलं आणि चौपाई वर ठेवलं. आम्ही चहाचा आणि सोबतच्या खाद्यपदार्थांचा मंद गतीने आस्वाद घेऊ लागलो. तेवढ्यात बाहेरचं दार थोडं किलकिलं झालं आणि बाहेरच्या माणसांनं "पेपर" अशी आरोळी ठोकीत एक मराठी दैनिक आत टाकलं. मुलाने पेपर उचलला आणि पुन्हा कोचावर बसून तो चाळू लागला. सकाळची वृत्तपत्र बघितली नव्हती म्हणून मी मुलाला, मुकुलला, कुतूहलानं विचारलं "मुकुल काय बातमी आहे? मथळे वाच नुसते." मुलाने वाचण्याचा प्रयत्न केला. चार- पाच स्तंभांवर आडवा पडलेला तो मोठ्या अक्षरातील मथळा, पण त्याला तो धड वाचता येईना. प्रत्येक अक्षरावर तो अडखळू लागला. त्याची ती त्रेधा पाहून ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , शिक्षण , भाषा , पालकत्व

प्रतिक्रिया

 1. किरण भिडे

    2 वर्षांपूर्वी

  कुठे मिळेल काही कल्पना?

 2. मुलं का बिघडतात वि वा शिरवाडकर

    2 वर्षांपूर्वी

  वि वा शिरवाडकर यांचा मुलं का बिघडतात हा लेख हवा आहे

 3. Kiran Joshi

    4 वर्षांपूर्वी

  Apratim Lekh!

 4. अमर पेठे

    4 वर्षांपूर्वी

  खूप महत्त्वाचा विषय आहे हा. आजू बाजूला बघितलं की हे प्रकार पदोपदी पाहायला मिळतात. उगाचच इंग्लिश फाडायच...लहानपणी स्वतःही असाच अनुभव घेतला. आमची कन्या इंग्लिश शाळेत होती आणि एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला, अर्थात इंग्लिश मध्ये. कन्येने छान पाठ करून बक्षीस वगैरे मिळवलं पण ते म्हणताना चेहऱ्यावर हावभाव शून्य. त्याच ठिकाणी तिच्याच वयाची मराठी शाळेतील मुली त्यांचे पाठांतर म्हणून दाखवत होत्या. आपोआपच तोंडातून उद्गार निघाले वाह वाह कारण त्या मुलींना मातृभाषेमुळे आपोआपच छान हावभाव जमत होते...खूप शिकायला मिळालं....इंग्लिश महत्वाची आहेच पण त्याचा अतिरेक गरजेचा नाही.

 5. विनय सामंत

    4 वर्षांपूर्वी

  आमच्या घरी पण हे मोठे फॅड आहे, मुलांना इंगजी यायलाच हवे, पर्याय नाही इ इ.. पण माझा बायकोचे। मला देखील त्यात जाणवलेली अडचण नेमकी हीच आहे की मुलांना इंग्रजी माध्यमातून आपण "माहिती" खूप देऊ शकतो पण ज्याला अनुभूती, साक्षात्कार म्हणतात (realization) ते परक्या भाषेतून रेडिमेड कसे देणार? आपले भवताल, सहकारी, नातेवाईक आणि त्यापासून येणारे अनुभव इ सारे मराठी असताना इंगजीच्या केवळ अट्टाहासाने आपण मुलांना खूप मोठ्या अनुभव विश्वापासून लांब ठेवतोय। शिवाय "मूल्य" कशी द्यायची हे तर खूपच कठीण आहे। पण अद्ययावत ज्ञान, तंत्रज्ञान, नवीन सारे संशोधन हे सारे केवळ इंग्रजीतच चालू आहे आणि ते झेपवायला आपल्या लोकल भाषा असमर्थ आहेत हे देखील तितकेच खरे (कारण आपण हे सारे भाषांतरित करतोय..) ह्या बाबतीत मला दाक्षिणात्य लोकांची खूप आश्चर्य वाटते। तामिळ, तेलगू आणि मल्याळम विशेषतः. ते केवळ त्यांच्या मातृभाषेत आणि इंग्रजीत बोलतात। आणि दोन्ही भाषा आणि कल्चर तितक्याच नेटकेपणाने सांभाळतात.. फेसबुक, कोरा, ट्विटर आशा सर्व सोशल मीडिया वर तंत्रज्ञान व धर्म/संस्कृती दोन्ही बाबतीत मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य लोकांची उपस्थिती व प्रभाव जाणवतो, आणि इंग्रजीत खूप चांगली मांडणी व पकड। जणू हिंदू संस्कृती व त्याचे खोल कंगोरे जगासमोर शास्त्रशुद्ध मांडायचा त्यांनी मक्ताच घेतला असावा.. हे मराठीत व्हायची गरज आहे। ज्ञानेश्वरी प्रत्येकांनी घरी ठेऊन आणि दर वर्षी आषाढीला जाऊन काय होणार? ज्ञानेश्वरांना आजच्या काळात मांडणार आणि आचारणार कोण आणि कसे? आणि हे कुणी हिंदी, इंग्रजी किंवा तामिळ नाही करणार, मराठी माणसाने , प्रत्येक मराठी माणसाने करायला हवे..

 6. dhampall

    4 वर्षांपूर्वी

  छान लेख आणि समर्पक title ???वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen