बिनपैशांचे खेळ


अंक – मौज दिवाळी २००८ ********** अलीकडे मी मुलं पाहतो. त्यांचे खेळ-खेळणी पाहतो. त्यांच्या खेळण्यांवर आणि खेळण्यासाठी होणार खर्च पाहतो. अत्यंत काळजीनं, मुलांना कुठलाही अपाय होऊ नये या दृष्टीनं डिझाईन केलेली त्यांची खेळणी, प्ले-ग्राऊंड्स पाहतो, त्या वेळी वाटतं, की कुठं होतं हे सारं माझ्या लहानपणी? केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्या वेळच्या माझ्या पिढीला हे मिळू शकलं नाही. की आताच्या सांस्कृतिक, आर्थिक गरजा बदलल्या? मुलांना अधिकाधिक संरक्षणाच्या आवरणाखाली आवळलं, की पालकांनी फक्त कायदेकानूंच्या कसोट्यांनुसार मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करताना मुलांचं बाल्य हरपलं? ते खरंच हरपलं, की आम्ही वाढलो तेव्हा आमचंच बाल्य हरपलं होतं? आणि आता आहे हेच खरं आहे? या सगळ्याला कारणीभूत काय आणि कोण? समजा, असेल आमचं बाल्य हरपलं, पण आयुष्यात आमचं कुठं काय अडलं? केवळ महाग किमतींच्या खेळण्यांमुळे बुद्धिमत्ता वाढते असं कुठं आहे? खेळताना इजा न होता वाढलेली मुलंच शूर होतात असं कुठं आहे? माझ्या लहानपणी कुठं होती खेळणी मला? होते ते सगळे समवयीन मित्रमैत्रिणी. होती ती केवळ घरातीलच नव्हे, तर आजुबाजूची सगळीच आदरणीय वडीलधारी मंडळी. होते ते आश्र्वासक वातावरण. आणि होते ते सतत मनावर घडत जाणारे संस्कार. या संस्कारांवर आणि बिनपैशांच्या खेळण्यांशी खेळतच आमचा पिंड वाढला. आज मी या गोष्टींचा विचार करायला लागलो तर मला माझं बालपण आठवतं. आजुबाजूचं पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचं माझ्या भोवतालच जग आठवतं, माणसं आठवतात. माझे सवंगडी आठवतात अन् त्यांच्याबरोबर मी जे बिनपैशांचे खेळ खेळत वाढलो ते खेळ आठवतात... माझं बालपण—नुसतं बालपणच नाही तर जन्मापासून ते कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं, अन् त्यानंतर लग्न ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज , दीर्घा , अनुभव कथन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen