कवितेची कथा


१. काल रात्री पाऊस ’ही लखलखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार कसा अंधार तुझा’ हे, असं काही लिहिणार्‍याला रसिक कितीही झालं तरी टाळू शकत नाही . कवितेच्या क्षेत्रात आपल्या मौखिक सादरीकरणाच्या करामतीने श्रोत्यांना भुरळ घालणार्‍या कवींची परंपरा इथे आहेच. पण तरीही अभिजात कवितेच्या नैतिकतेचा आब राखून रसिकरंजन साधण्याची किमया क्वचितच यशस्वी होते. हे छान जमलेला, पुण्याचा वैभव जोशी अनेक सिनेमांची गीतं, कथा, पटकथा असं करता करता स्वत:चा आणि कवितेचा शोध घेणारा असा कवी त्याच्या सच्चेपणाची ग्वाही त्याच्या कवितेतूनच देतो. https://www.youtube.com/watch?v=q8H8HNFJcDI काल रात्री पाऊस काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता इतका जवळ की पिल्लू म्हणालासुद्धा डॅडी उशीखालची वही भिजेल अर्थात मी त्याला सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मत:च ओलीचिंब असते! एकतर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही आणि तसंही कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही ! ! ! पाऊस, खिडकी, अंगचटी, उशीखालची वही, ओलीचिंब या सार्‍या प्रतिमा-विशेषणाच्या नक्षीतून चित्र पूर्ण होत असतांनाच 'कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही’, या वाक्यात या चित्राला फ्रेम होऊन ते भिंतीवर टांगण्याचं कार्य संपन्न होताना दिसतं. कविता निर्माण होते, लिहिली जाते, सादर केली जाते, गायली जाते इ. पण कविता समजावून सांगणे अशक्य असते, किंबहुना अशी कबुली देणे हे खरे धाडसाचे आणि अवघड काम आहे. कविता शिकवणे, तिची समीक्षा करणे हे कविताबाह्य आणि आमच्या एका परखड कवीमित्राच्या भाषेत ’आचरट’ प्रकार आहेत . तुम्ही कवितेचा आस्वाद घ्या, दाद द्या, टाळ्या वाजवा, अगद ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , कविता , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. kiran bhide

      8 वर्षांपूर्वी

    सुचवल्याबद्दल धन्यवाद. करूया...

  2. M.R.PANDAO

      8 वर्षांपूर्वी

    pl.post some poetry of VINDA KARANDIKAR

  3. natujaya

      8 वर्षांपूर्वी

    "देवा तुझे किती सुंदर आकाश ","उठा उठा चिऊताई ""आजीच्या जवळी " अश्या आमच्या वेळच्या कविता आठवून गेल्या .त्यांचे कवी त्यावेळी माहित नव्हते .त्याची गरजही नव्हती आम्हाला आणि कवींना !

  4. natujaya

      8 वर्षांपूर्वी

    The source of poetry is intensely private,but it is not personal.....poetry must lead reader not to poet,s life,but to reader,s own.------By Anne Michaels



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen