उमेद


मराठी मासिकं-साप्ताहिकं ही तसं पहायला गेलं तर कायम कसल्या नां कसल्या संकटांनी घेरलेली असतात. मग ते संकट टीव्ही, मालिकांमुळे झालेला खपावर परिणाम असेल वा नवनवीन लेखन मिळवणं कसं अवघड जातं, हे असेल... म्हणजे जयवंत दळवींच्या शब्दात पुन्हा एकदा सांगायचं तर मराठी व्याकरणात भले तीन काळ असतील पण मराठी जगतात कायम एक चवथा काळ असतो – पडता काळ!.. तेव्हा अशा परिस्थितीत ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाने या ऑगस्ट महिन्यात एकवीसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे हे निश्र्चितच अभिनंदनीय आहे. एका विशिष्ट भूमिकेतून विद्या बाळ शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांशी विविध विषयांवर सातत्याने संवाद साधत राहिल्या. स्त्रियांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. माणूसपण जागवणारं ‘भान’ सजगपणे जगण्याचा खोल आत्मविश्वास अन् सकारात्मकतेनं, विचारशीलतेनं संवाद साधण्याचा विश्र्वास त्यांनी समाजातल्या मोठ्या गटाला देऊ केलेला आहे. या निमित्ताने ‘अक्षरधारा’ ऑगस्ट २०१९ च्या अंकात ‘अक्षरधारा’च्या कार्यकारी संपादिका स्नेहा अवसरीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यात एखादं मासिक कसं टिकवून ठेवता येतं ह्याचा उलगडा विद्या बाळ यांच्या विचार आणि कार्यप्रणालीत दिसतो. तो सकारात्मक दृष्टिकोण समजून घेण्यासाठी हे वाचायलाच हवे. त्यात म्हटलं आहे- मासिकांच्या पडत्या काळातच विद्याताईंनी हे मासिक सुरू केलं होतं. तीस वर्षानंतरही मासिकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मासिकाची गरज या सम ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


निवडक नियतकालिके

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen