निवडक अग्रलेख - २० सप्टेंबर २०१९


अक्षम आणि म्हणून पराभूत माणसे आपल्या अपयशाची कारणे भेदाभेदाच्या राजकारणात शोधत असतात. जातीय समीकरणातून आपल्याला नालायक ठरविले जात आहे, असे कारण अपयशानंतर समोर केले जाते. तसेच समकालीन राजकारणात मतदान यंत्रालाच सारा दोष दिला जातो आहे. अगदी गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी ‘‘एकदा ईव्हीएम गेले तर भाजपही जाईल. मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल.’’ असे विधान केले होते. त्यासाठी त्यांनी सोनिया आणि ममता यांची भेट घेतली होती. या निमित्ताने विरोधी पक्षांची एक मोट बांधण्याची संधी साधून घेण्याचा हा प्रयत्न होता, मात्र महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीपासून आप, बसपा सारखे पक्षही यापासून दूरच राहिले. या पक्षांनी नेमके का असे केले, यावर नंतर चर्चा करू, मात्र केवळ मतदान यंत्रामुळेच निवडणुका जिंकता येतात असा विचार ‘राजकीयदृष्ट्या चूक’ आहे, हे किमान शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने तरी मान्य करावे. तळागाळापर्यंत पाझरलेली कार्यकर्त्यांची फळी असते, नेतृत्व असते आणि संघटन मजबूत असावे लागते. म्हणूनच मनसेच्या स्थापनेच्या वेळी पवारांनी राज ठाकरे यांना सकाळी उठा आणि राज्यभर फिरा, असा सल्ला दिला होता. राज ठाकरे गेल्या दोन दशकात नाशिकच्या पलिकडे गेले नाहीत. पूर्ण राज्याचा दौरा कधी केला नाही अन्‌ अशा नेत्याने केवळ यंत्राने निवडणूक जिंकता येते, असे मानणे सहज आहे. मात्र ज्यांना जनता कळते, ज्यांनी पक्ष संघटना उभी केली आहे आणि आपल्या बळावर सत्ता आणली आहे, अशा मायावती, केजरीवाल, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना हे नक्कीच कळते की मतदानयंत्रांत छेडछाड करता येत नाही आणि केवळ यांत्रिक करामतीने सत्ता हस्तगत करता येत नाही. आजचा निवडक अग्रलेख तरुण भारत नागपूरचा तरुण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , निवडक अग्रलेख , तरुण भारत नागपूर

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen