देव कुणाच्या मुखातून काय भविष्य बोलून जाईल सांगता येत नाही. गुलाम हैदर त्या वाळक्या अंगाच्या एकोणीस वर्षाच्या मुलीला घेऊन निर्माता शशधर मुखर्जीकडे गेला होता. गरिबीने माणूस मूक होतो पण तिला त्यासाठी तोंड उघडणं हाच तर मार्ग होता. मुखर्जी म्हणाले तिचा आवाज खूप पातळ आहे. गुलाम हैदर बोलून गेला, 'पुढल्या काळात निर्माते तिच्या पाया पडून आमच्या सिनेमासाठी गा म्हणतील'. हैदरवाणी खरी ठरली....सार्वभौम सत्ता! अश्वमेधाचा वारू असा फिरला की जाईल तिथे तेच नाव. जग पादाक्रांत करून झालं, काही म्हणजे काही शिल्लक उरलं नाही. भूप रागात 'म' आणि 'नी' वर्ज्य असतात, मग उरतात फक्त पाच स्वर. सा, रे, ग, प आणि ध. दीनानाथांच्या घरात हा भूप राग दर दोन वर्षांच्या अंतराने आकाराला आला.ही 'सा' अग्रस्थानी, मग रे, ग, प भगिनी आणि भाऊ 'ध'. भूप म्हणजे राजा. त्याला 'मनी' वर्ज्य कारण तो सार्वभौम आहे, त्याला काय करायचीये तुमची चलनी संपत्ती घेऊन? आपण शरीरावर दागदागिने घालून मिरवतो, हे गळ्यामधे जडजवाहीर घेऊन आलेले स्वर्गीय आत्मे. सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण एकाच टीममधून खेळण्याचा योग आपण अनुभवला हे आपलं भाग्यं तसंच हे कुटुंब. कृष्णाने गीता संस्कृतात सांगितली, बराचकाळ ती मर्यादित राहिली त्यामुळे, सामान्य लोकांना कसं कळणार, काही पिढ्या मुकल्या ज्ञानाला. ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली, नुसती भाषांतरीत नाही केली तर अनंत चपलख उदाहरणं देऊन ती समजावून सांगितली. अनुवाद नव्हे तो, भाष्यं आहे ते. त्यामुळे काय झालं? तर ती सामान्य माणसाला कळली. शास्त्रीय संगीत असंच बंदिस्त असतं. सामान्यांना त्यातलं फार कळत नाही म्हणून ते लांब रहातात त्यापासून. चित्रपट संगीताने तेच काम केलं. अनेक गाणी रागदारीत झाली, लोकांना साधे,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच तरलं
Rajkuvar
6 वर्षांपूर्वीसुंदर
Rdesai
6 वर्षांपूर्वीखूप छान !
manisha.kale
6 वर्षांपूर्वीApratim.
raginipant
6 वर्षांपूर्वीउत्तुंग व्यक्तिमत्वाचे अत्यंत सुंदर वर्णन
raginipant
6 वर्षांपूर्वीअवर्णनीय लता लेख ही तसाच
pjanaokar
6 वर्षांपूर्वीApratim shabd apure
vilasrose
6 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख.