एक 'प्रासादिक' मृत्युलेख


लेखक, प्रकाशक, संपादक  असलेल्या यशवंत गोपाळ जोशी (१७ डिसेंबर १९०१- ७ नोव्हेंबर १९६३) यांना सगळे य.गो. जोशी याच नावाने ओळखतात. यशवंत गोपाळ म्हटले की ते अनोळखी वाटतात आणि ‘यगो’ म्हटले की अगदी जवळचे, आप्तासारखे. कारण  ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘वहिनीच्या बांगड्या’ सारखे चित्रपट लिहिल्याने ते कुटुंबातलेच एक वाटायचे. लेखक म्हणून त्यांनी फडके-खांडेकरांच्या काळात स्वतःची वेगळी वाट चोखाळली आणि प्रणयापेक्षा त्याग, कुटुंबमूल्ये यांना महत्व देणारी कथानके लिहिली. प्रकाशक म्हणूनही त्यांनी वैचारिक पुस्तके प्रसिद्ध करण्यास प्राधान्य दिले. सोशॅलिझम, फॅसिझम, कम्युनिझम आदि संकल्पनांवर मराठीत ग्रंथ उपलब्ध करून दिले. अध्यात्मिक, वैचारिक , चितनात्मक अशा ‘प्रसाद’ या मासिकाचे ते संपादक होते. त्यांच्या मृत्यूनंतर शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर यांनी १९६३ सालच्या ‘प्रसाद’ या मासिकात लिहिलेला हा लेख. सोनोपंत हे स्वतः संत साहित्याचे गाढे अभ्यासक. तुकारामांची गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, अध्यात्म शास्त्राची मूलतत्वे असे ग्रंथ त्यांनी संपादित केले. प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून ते जनसामान्यांमध्ये परिचित होते. शास्त्री- दांडेकर यांचा स्नेह कसा जुळला, कसा वृद्धिंगत झाला आणि अखेर प्रसाद या मासिकाचे संपादकपदही सोनोपंतांकडे कसे आले हे सांगणारा हा मृत्यूलेख. यगोंच्या अनोपचारिक, कौटुंबिक शैलीला त्याच शैलीत वाहिलेली आदरांजली जणू. मला चुकूनही वाटले नव्हते की अडीच तीन महिन्यांपूर्वी भाऊंच्या घरी त्यांची माझी झालेली भेट ही शेवटचीच होती म्हणून! प्रकाशित पुस्तकाच्याबाबत एका कामासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. पण विधिघटना विचित्र असतात हेच खरे! जोशीबोवा आजारी होते. मीही आजारीच झालो होतो. त्यांनी मला विश्रांती ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रसाद , पुनश्च , व्यक्ती परिचय , शं. वा. दांडेकर

प्रतिक्रिया

  1. arush

      2 वर्षांपूर्वी

    ओघवता लेख

  2. Mannishalohokare

      2 वर्षांपूर्वी

    अप्रतिम !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen