म्हातारपणावरचं तरुण गाणं


म्हातारपणावरचं तरुण गाणं... "येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण! . . हिरवं पान कधीतरी पिकणारच, पिकलं पान कधीतरी गळणारच, गळलं पान मातीला हे मिळणारच. . . . . झाड कधी कण्हतं का? कधी काही म्हणतं का? . . गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान, कविता पिवळी पिवळी धमक वाचत जातं पिकलं पान! . . नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! . . बोरकर एकदा म्हणाले सिगारेटचा सोडीत धूर : "सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुणताजा सूर! तीन मजले चढून आलो असा दम अजून श्वासात - ओत थोडी व्हिस्की ग्लासात!" . . कवितांतून रंग रंग झरू लागले प्रत्येक क्षण आनंदाने भरू लागले! . . घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण, धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण! . . पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत उभा होता किती वेळ, रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ! रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ! मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं, जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं! . . खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! . . आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे? नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे? अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा? थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा? . . तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही ठरवा! . . त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो: वय तुमचं साठ असो, सत्तर असो, तिच्यासाठी फुलांची आणा वेणी; मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणते थोडीशी काजू फेणी! . . तरुण असलो की तरु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , कविता , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. asmitaph

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen