अंक- अलका, दीपावली १९५९ गंमत बघा. आपण म्हणतो, बदल हाच जगाचा स्थायीभाव आहे. पण प्रत्यक्षात बघायला जावं तर बदल न होणं हाच स्थायीभाव दिसतो. खड्डे, भ्रष्टाचार,महागाई, बेकारी गेली शेकडो वर्षे कायम आहेत. तर दिवाळी अंकामध्ये आता आधीसारखी गंमत राहिलेली नाही, हेही आपण गेली पन्नास वर्षे ऐकतोय. १९५९साली, म्हणजे मराठी दिवाळी अंकांच्या सुवर्णवर्षी, दिवाळी अंकांविषयी ज्या तक्रारी होत्या, त्याच तक्रारी आजही तशाच कायम आहेत. म्हणजे साठ वर्षात काहीच बदललेले नाही असे म्हणायचे? की साठ वर्षांपूर्वी जे बिघडले होते,ते अधिक बिघडणार नाही याची आपण दक्षता घेतली असे म्हणायचे? साठ वर्षांपूर्वी १५० दिवाळी अंक निघत, आता ३५० निघतात. या वास्तवाच्या प्रकाशात वाचा, १९०९ साली आलेल्या मराठीतील पहिल्या दिवाळी अंकाची ही हकीकत. हा लेख लिहिला आहे बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (२६ मार्च १९०९- २७ नोव्हेंबर २०००) यांनी, अर्थात १९५९ साली. सातोस्कर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख ग्रंथपाल होते. कथा, कादंबरी, ललित लेख अशा पन्नासेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ********** नवरात्र संपून दसरा उजाडला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दिवाळीचे वेध लागतात. मोरू फटाक्यासाठी बापाला तगादा लावतो, मोरूची आई चकल्या, कडबोळी, करंज्यांचे साहित्य गोळा करू लागते, मोरूची बहिण रांगोळीसाठी पांढरा दगड कुटूं लागते, आणि मोरूचा बाप दिवाळीच्या खर्चाचा लागणारा जादा पैसा कसा उभारावा याच्या क्लृप्त्या शोधून काढण्यांत दंग होतो. एखादा मोरूचा बाप जर संपादक असला किंवा एखाद्या मासिकाचा चालक असला तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचे सोने लुटण्यासाठी शिलंगणाला जाण्याऐवजी तो दिवाळी अंकाच्या पानांतून किती सोन ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kantilal-Oswal
5 वर्षांपूर्वीछान लेख आहे....
SMIRA
6 वर्षांपूर्वीलेख मस्त. आवडला
avthite
6 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख.. पण तो पुनः प्रकाशित अंक मिळाला तर छानच आहे
vilasrose
6 वर्षांपूर्वीलेख आवडला.
रामदास
6 वर्षांपूर्वीबा द सातोस्क र दै गोमंत क चे पहिले संपादक होते
किरण भिडे
6 वर्षांपूर्वी२००९ साली १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात पुनः प्रकाशित केले होते कोणीतरी...
[email protected]
6 वर्षांपूर्वीवाह फारच छान लेख ...
DILIPKURHADE
6 वर्षांपूर्वीInteresting information. Thanks for your efforts.
DILIPKURHADE
6 वर्षांपूर्वीIs it possible to publish this Diwali magazin again.