बायकोला कंटाळलेल्या लेखकाला हवी दुसरी बायको!

एका नामवंत प्रतिथयश लेखकाने ११-१२ वर्षे संसार केला. त्यांच्या पत्नीची बौद्धिक पातळी कमी असल्याने तिला आपल्या लेखक पतीचे मोठेपण कळत नव्हते. त्यामुळे लेखक फार अस्वस्थ होता. गो. म. चिपळूणकर हे स्त्री शिक्षणास वाहून घेतलेले सुधारक होते. त्यामुळे चिपळूणकरांनी या लेखक महाशांना दुसरी (बुद्धिवान) पत्नी मिळवून द्यावी असे पत्र या लेखकाच्या मित्राने धाडले. ते पत्र आणि त्याला चिपळूणकरांनी दिलेले दीर्घ उत्तर म्हणजे एक अक्षर ऐवज आहे.  अंक – यशवंत मासिकाच्या डिसेंबर १९२८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा ‘पत्र व्यवहार’ आहे.

गो. म. चिपळूणकर  हे स्त्रियांच्या शिक्षणाचा अहोरात्र विचार करणारे व अकाली निधन पावलेले एक ध्येयवादी सुधारक होते. १९१८ च्या सुमारास अमेरिकेहून आले आणि त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास वाहून घेतले. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था) धुरीणांपैकी ते एक होते. पहिले महायुद्ध झाले आणि देशात आर्थिक चणचण भासू लागली. त्या वेळी संस्थेच्या तत्कालीन धुरीणांची बैठक झाली. त्यामध्ये चिपळूणकर यांनी स्त्री शिक्षणासाठी पैसा जमविण्यासाठी ‘भाऊबीज’ ही संकल्पना मांडली. (१९१९पासून भाऊबीजेची ही परंपरा टिकून आहे.)

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. amarsukruta

    उत्तम लेख. आजच्या काळातही घेण्यासारखा.

  2. ashalande100@gmail.com

    खरंच , आज एवढा काळ लोटून सुद्धा विवाहविषयक समस्या जिथल्या तिथेच आहे. खुप मुद्देसूद उत्तर दिले आहे. असे विचार आजही आवश्यक आहेत. खुप गृहकर्तव्यदक्ष गृहिणी सगळं छान करून सुद्धा निराशेतच जगतात. ते कां , ह्याचे फारच मार्मीक विवेचन या उत्तरात केले आहे. तशा मानसिकतेच्या विवाहीत गृहस्थाने जरूर अभ्यासावा असा हा लेख !
    खुप खुप धन्यवाद.

Leave a Reply