वेगवेगळ्या भाज्यांची एकत्रित खिचडी कशी होते हे कधी चाखून बघितलंय ? आणि या जोडीला नानाविध मसाल्यांची जर फोडणी त्याला मिळाली, तर होणारा पदार्थ जीभेला छान लागतो पण त्याची नेमकी चव सांगता येत नाही. अशी काहीशी अवस्था आजच्या लेखासाठी अग्रलेखाचा विषय ठरवताना झाली. गेल्या आठवड्यात प्रत्येक वृत्तपत्राने इतके भिन्न भिन्न विषय चर्चेला घेतले आहेत की त्याची सर्वांची गणना आणि मांडणी या लेखात करणे कठीण झाले. म्हणून मग या सर्वात असलेला एक समान सूत्राचा धागा आपल्याला घ्यावा लागला. जो आहे शेतकऱ्यांचा. महिनाभर चालू असलेल्या राजकीय साठमारीत, काही भागातला कोरडा दुष्काळ, उर्वरीत भागातला ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची दैना झाली. याच दरम्यान आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील शहरांची देखील वाट लागली. मात्र सरकारचे अस्तित्व नसल्याने त्यांना कुणी वालीही नाही अशी स्थिती. सगळेच राजकीय पक्ष शेतकऱ्यांबद्दल कळवळा व्यक्त करत असले तरी त्यांचे ९९ % लक्ष मात्र मुंबईतील राजभवन आणि विधानभवनाकडे लागले आहे. दरम्यान राष्ट्रपती राजवट चालवणाऱ्या राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची भावना सर्वत्र आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयाच्या अनुषंगाने विविध अग्रलेख काय म्हणाले, याची झलक आणि सोबत त्या त्या अग्रलेखाची लिंक आपण आज बघूया. ********** आत्महत्या करणा-या शेतक-याने त्याला जमेल तसे बँक कर्ज, सावकारी कर्ज, हातउसने याची परतफेड केलेली असते, मात्र नापिकी किंवा अवकाळीने शेतातली उभी पिके नष्ट होतात, अशावेळी कशाच्या जोरावर पैसा तयार करायचा हा प्रश्न त्याला सतावत असतो. शेतक-याच्या आत्महत्येआधी कर्जबाजारीपण, सावकाराचा, बँकांचा तगादा, कुटुंबातील कलह, भावकीचा संघर्ष, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण आदी का ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Maheshnamu
5 वर्षांपूर्वी