चंद्र हा अनादी काळापासून मानवी कुतुहलाचा विषय आहे. भारतीय पुराणांमध्ये तर श्रीरामाने चंद्राचा हट्ट धरल्यामुळे आणि श्री शंकराने चंद्राला थेट 'भाळी धरल्याने' चंद्र हा आपला फार पूर्वीपासूनचा सखा आहे. पृथ्वी ओलांडून चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याची स्वप्ने माणूस जगभऱ पाहात आला आहे. माणसापेक्षा विज्ञानाची गती अधिक असते. १९५८ साली पहिल्यांदा जेंव्हा माणसाला हे स्वप्न सत्यात येण्याची शक्यता वाटू लागली, त्याची चर्चा होऊ लागली तेंव्हा हे साध्य करायला आणखाी २५ वर्षे लागतील असे म्हटले गेले होते. प्रत्यक्षात त्यानंतर अकरा वर्षांतच हे साध्य झाले आणि २० जुलै १९६९ रोजी मानवाने चंद्र पादाक्रांत केला. आता तर भारतही या क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे आणि चंद्रासोबतच मंगळाचीही स्पप्ने पाहात आहे. प्रस्तुतचा लेख १९५८ साली नवाकाळ मध्ये आलेला आहे. त्यात आधी साहित्यात आलेली,१८०० वर्षांपूर्वीची चंद्रसफर आणि मग दृष्टीपथात आलेला चंद्र असा मागोवा घेतलेला आहे. ............................................. अंक – नवाकाळ, दिवाळी १९५८ सुमारे १८०० वर्षापूर्वी म्हणजे युरोपांत रोमन साम्राज्य अस्तित्वांत असतांनाची हकिगत. ल्युकिअन नांवाच्या एका ग्रीक लेखकाने चंद्रलोकावरील एका प्रवासाची सुरस अशी काल्पनिक कथा अगदी प्रथमच लिहिली. अटलांटिक महासागरां मानत प्रवास करीत असणारे एक जहाज प्रचंड अशा वादळात सांपडले व उंचच उंच उसळणाऱ्या पाण्याच्या लाटांबरोबर एखाद्या चेंडूप्रमाणे आकाशांत फेकले गेले. ते इतके उंच फेकले गेले की अखेर ८ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर ते जहाज चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन धडकले, ल्युकिअन याने लिहिलेली वरील कथा निव्वळ काल्पनिक. या कथेचे भाषांतर लॅटिन भाषेत करतांना भाषांत ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .