माधव मनोहरांना प्रेमाने, आदराने किंवा कदाचित धास्तीनेही इन्सपेक्टर म्हटले जात असे. कारण साहित्यातील, नाटकांच्या संहितांमधील चोऱ्या ते हमखास पकडीत. त्यांची नाट्यसमीक्षा लंबी चौडी असे आणि त्या समीक्षेची एक खास शैली असे. माधवरावांनी भले आपल्याला धारेवर धरावे परंतु आपल्यावर त्यांनी लिहावे, आपल्या नाटकावर लिहावे असे सगळ्यांना वाटत असे. वर्षभरात आलेल्या नाटकांचा वर्षअखेर एक धावता आढावा ते घेत. १९७६ साली आलेल्या नाटकांचा त्यांनी घेतलेला हा अतिशय मनोरंजक, भेदक, मर्मभेदी, खोडसाळ, चिमटे काढणारा आणि त्यांना योग्य वाटेल त्याचे वारेमाप कौतुकही करणारा आढावा. १९७६ साली खानोलकर, शिरवाडकर, आळेकर, कानेटकर अशा अनेक दिग्गजांची नाटके रंमभूमीवर आली होती. त्यामुळे हा आढावा अत्यंत रसाळही झाला आहे- ********** आरंभीच सांगून टाकतो की, गेले वर्ष मराठी नाटकाच्या लेखी—एका कारणासाठी तरी निदान—संस्मरणीय ठरावे असे आहे. ते कारण म्हणजे, एक विजय तेंडुलकरांसारखे काही उज्ज्वल अपवाद वगळता प्रायशः सर्व जुन्या-नव्या प्रमुख नाटककारांची (बहुतकरुन प्रातिनिधिक अशी) नाटके गेल्या साली प्रकाशित झाली आहेत. आणि त्यांपैकी कित्येक नाटकांनी एकूण मराठी नाटकालाच समृद्ध केले आहे. गेल्या सालचा मराठी नाटकाच्या संबंधातील आणखी एक उल्लेखनीय विशेष असा की या कालखंडात एक ‘आनंद’चा अपवाद वगळता एकही प्रकृतिगंभीर अशी अनुवादित, रूपांतरित वा भाषांतरीत नाट्यकृती नाही. म्हणजे असे की, सर्वच नाट्यकृती स्वतंत्र, मौलिक आणि पृथगात्म आहेत. हा विशेषही मराठी नाटकाच्या लेखी केवळ उल्लेखनीयच नव्हे, तर एका अर्थाने अभिनन्दनीयसुद्धा समजावा लागेल. कारण मूळ अन्यभाषी नाटकाला सर्वतोपरींनी आणि सर्वतोपरींचा न्याय देणारे यथमूल अनुवाद एकूण मराठी नाटका ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
नाटक रसास्वाद
, ललित
, दीर्घा