महाराष्ट्र आणि गोवा ही दोन्ही मराठी संस्कृतीची केंद्रे असली तरी गोव्यातील अनेक महत्त्वाच्या समाजनायकांचा आणि त्यांच्या मोठेपणाचा महाराष्ट्राला परिचय नाही. केशव अनंत नायक हे त्यातलेच एक. १९७० साली ‘दीपावली’ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख आहे. ‘पुनश्च’च्या व्यक्तिपर लेखांच्या मालिके अंतर्गत देत असलेल्या या लेखात नायक यांच्या कार्याविषयी, मोठेपणाविषयी तर लिहिलेले आहेच, शिवाय गोव्यातील त्या वेळच्या सामाजिक घटकांविषयही मजेदार माहिती,किस्से दिलेले आहेत. १९२१ सालच्या एका व्याख्यानमालेत ‘सोशल सर्व्हिस लीग’चे अनंत वि. चित्रे यांचे ‘मद्यपान’ या विषयावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,त्याचा किस्सा तर धमालच आहे… गोमंतकाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते श्री. केशवराव अनंत नायक यांच्या वयाला सप्टेंबर महिन्यात पंचाहत्तर वर्षे पूर्ण होऊन त्यांनी शहात्तराव्या वर्षात पदार्पण केले. येत्या नोव्हेंबर महिन्यात गोव्यामध्ये त्यांचा अमृत महोत्सव मोठ्या थाटाने साजरा होणार आहे. या निमित्ताने आम्हीही श्री. नायक यांना विनम्रभावाने अभिवादन करून हे सन्मानपुष्प त्यांना अर्पण करीत आहोत आणि त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भरपूर मनःस्वास्थ्य लाभो अशी प्रार्थना करतो. – संपादक ********** अंक – दिपावली,ऑक्टोबर १९७० श्री. केशव अनंत नायक यांचे नाव घेतले की एक शांत, सौम्य वृत्तीची व धीरगंभीर अशी व्यक्ती आपल्या मनश्चक्षूंसमोर उभी राहते. पण प्रसंग आला तर ही व्यक्ती तितकीच खंबीर व करारी आहे असे आपल्याला आढळून येईल. श्री. नायक यांचा जन्म आपल्या लहानशा गोमंतकात झाला हे आमचे सुदैव तर एका दृष्टीने पाह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वीछान
arush
5 वर्षांपूर्वीअतिउत्तम व सखोल माहिती