‘अविस्मरणीय’ भाषणे

‘नवनीत’ एप्रिल १९६७

(१)

एकदा माझी लोकप्रियता एकाएकी अफाट वाढलेली पाहून माझी छाती फुगून गेली! पालघरला गणेशोत्सवात माझे व्याख्यान ठरलेले होते. जाहीर झालेल्या वेळी माझ्या यजमानासह मी व्याख्यानाचे ठिकाणाजवळ जाऊन पोचलो. पहातो तो ही गर्दी! बायकामुलांचा नि पुरुषांचा तोबा! गलबला नि आरडाओरड! आम्हाला आत प्रवेश मिळण्याची मारामार! आजचे ‘नामांकित’ वक्‍ते आले आहेत असा कोणी पुकारा केला तरी वाट मिळेना! एकही टाळी मिळाली नाही. नुसती रेटारेटी, गडबड नि गोंधळ! कसेबसे मला व्यासपीठावर नेऊन माझ्या खुर्चीवर बसविण्यात आले. सेक्रेटरींना नमस्कारपूर्वक माझे स्वागत केले. उत्सवाचे अध्यक्ष स्थानापन्न झाले. सुदैवाने ध्वनिक्षेपक नादुरुस्त नव्हता. सभा सुरू होणार हे लक्षात घेऊन शांतता प्रस्थापित होईल अशी चालकांची अपेक्षा होती. माझी ओळख करून देण्यासाठी अध्यक्ष उभे राहिले. ‘बंधु-भगिनींनो’ या शब्दाने त्यांचे तोंडही उघडले. पण लोक गप्प होण्याचे चिन्ह दिसेना. उलट गलबला अधिकच वाढला. रेटारेटीला मर्यादा राहिली नाही. जो तो पुढे सरकण्याचा प्रयत्न करीत होता. ‘शांत व्हा’, ‘शांत व्हा’ असे स्वयंसेवक सारखे ओरडत होते. इतक्या जोराने की लोकांच्या आरडाओरडीपेक्षा स्वयंसेवकांच्या आवाजानेच कानठळ्या बसाव्या! मी मात्र मनातून बेहद्द खूष होतो. माझ्या तोंडून ‘संन्यास आणि कर्मयोग’ हा विषय समजावून घ्यायला ज्या गावात इतकी तोबा गर्दी उडते त्या गावची बायकामुले देखील इतकी अध्यात्मपरायण आणि जिज्ञासू पाहून मी अगदी चाट झालो.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu