लेखन व्यवसाय व चरितार्थ


लेखनाकडे एक 'अंतरीचा उमाळा' यापलीकडे एक चरितार्थाचे साधन म्हणून बघणाऱ्या लेखकांसाठी मार्गदर्शक असा लेख 'पारिजात' जानेवारी १९३४  आजकाल पाश्चिमात्य देशांत जे अनेक व्यवसाय म्हणजे कोणते तरी काम करून चरितार्थासाठी पुरेसे किंवा अधिक पैसे मिळविण्याचे उद्योग अथवा धंदे आहेत त्यांत लेखनव्यवसाय हा एक मानाचा आणि महत्त्वाचा आहे. आपले नित्याचे काम आटपून उरल्या वेळात सरस्वतीची सेवा लेखनमार्गाने करणारे लोक तिकडेही नाहीत असे नाही. पण ते थोडे आहेत. आणि लेखनव्यवसाय सर्वस्वी करणारे व इतर व्यवसायांप्रमाणेच त्याच्या प्राप्तीतून आपला संसार वगैरे नेटका करून चार पैसे गाठीला बांधून ठेवणारे तिकडे आता बरेच लोक झाले आहेत. व खानेसुमारीच्या वेळी हे लोक आपला धंदा किंवा व्यवसाय ‘लेखन’ किंवा ‘ग्रंथकर्तृत्व’ असा सांगतात. अर्थात इतर व्यवसायांप्रमाणे याही व्यवसायात मोठी प्राप्ती थोडक्यांना होते व बऱ्याच जणांचा फक्त उदरनिर्वाह होतो व काहींनी काही काळपर्यंत तोही पल्ला गाठलेला नसतो. इतर धंद्यांप्रमाणे यातही चार पैसे मिळू लागण्याला उमेदवारी करावी लागते, वाट पहावी लागते व इतर धंद्यांप्रमाणे यातही बरीचशी मंडळी उदरनिर्वाहाला लागेल त्या पलीकडे फारसे मिळवू शकत नाहीत. तेव्हा तिकडे हा व्यवसाय वकिली, वैद्यकी, व्यापार यांप्रमाणे आहे. व्यवसाय किंवा धंदा या शब्दाची आर्थिक व्याख्याच अशी आहे की त्यामुळे उदरनिर्वाह हा झालाच पाहिजे आणि अशा दृष्टीने पाहता वर्तमानपत्रात पगार घेऊन काम करणार्‍या लेखकांव्यतिरिक्त इतर फारच थोड्या लेखकांच्या बाबतीत आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रात लेखनाला व्यवसाय किंवा धंदा असे नाव देता येईल. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , पारिजात , भाषा , करिअर
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    आजही ठराविक लेखक सोडले तर परीस्थिती काही खास बदललेली नाही

  2. sakul

      7 वर्षांपूर्वी

    >वर्तमानपत्रात लेखनव्दारा काम करणे (Journalism) म्हणजे ग्रंथकर्तृत्व (Authorship) नव्हे,< पण Journalism करून Authorship मिळविणारे आपल्याकडे अनेक आहेत की..!

  3. मोहिनी पिटके

      7 वर्षांपूर्वी

    सर्जनशील कलावंताचे प्राक्तन ऑर्वेलच्या वाट्यालाही आले होते . हे वेदनामय एकटेपण कदाचित त्यांच्या निर्मितीची प्रेरणा ठरत असेल . कारण श्रेष्ठ साहित्य अशा वेदनेतूनच जन्म घेते अस्वस्थ करणारा लेख लेखन व्यवहारासंबंधीचा लेख अगदी वास्तव आहे . पूर्वीचे वृत्तपत्रीय लिखाण आजच्या वृत्तपत्रीय लिखाणासारखे अल्पजीवी नव्हते . दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखनावर लेखकाचा चरितार्थ चालायला हवा . आपल्याला अनेक प्रतिभावंतांची अशी उदाहरणे माहित आहेत .

  4. मोहिनी पिटके

      7 वर्षांपूर्वी

    सर्जनशील कलावंताचे प्राक्तन ऑर्वेलच्या वाट्यालाही आले होते . हे वेदनामय एकटेपण कदाचित त्यांच्या निर्मितीची प्रेरणा ठरत असेल . कारण श्रेष्ठ साहित्य अशा वेदनेतूनच जन्म घेते अस्वस्थ करणारा लेख

  5. मकरंद जोशी

      7 वर्षांपूर्वी

    काळ बदललेला असला तरी मराठी साहित्य व्यवहाराची गती आणि मती काही फार बदललेली नाही. त्यामुळे यातील अनेक मुद्दे आणि सूचना आज ही लागू होतात ... पण लक्षात कोण घेतो ?

  6. sachinkelkar

      7 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख. काळ बदलला आहे.. आताच्या नाव नवीन टेकनॉलॉजिचा वापर करून चांगले साहित्य पोचवण्याचे खूप सुंदर मार्ग उपलब्ध झाले आहेत. पण लेखकाला योग्य ते मानधन मिळणे हे खूपच महत्वाचे आहे या प्रोसेस मध्ये. परवा माझी एक बहीण सांगत होती कि त्यांच्या एका एकांकिकेला २५,००० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्या एकांकिकेच्या लेखकाला फक्त १५०० रुपये.. हे असे का ? एकीकडे " कॉन्टेन्ट इज किंग" असे म्हणायचे आणि जो चांगला कन्टेन्ट बनवतो त्याला अशी सापत्नीक वागणूक ??? पुनश्च लेखकाला मानधन देतेच हे समजले आणि खूप आनंद झाला. पुढील वाटचाली करिता शुभेच्छा

  7. आकाश ताम्हणकर

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen