छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दुर्मिळ ‘अभंग’


अंक – एकता (दिवाळी अंक), नोव्हेंबर-डिसेंबर २००५

लेखाबद्दल थोडेसे :  छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व अर्थाने युगप्रवर्तक प्रतिभावंत होते. ज्यांच्या मनात स्वराज्याची कल्पना,प्रजाहिताच्या असंख्य योजना जन्माला आल्या तो राजा सृजनाचा धनी असणे योगाने आलेच. खुद्द शिवाजी महाराजांनी रचलेला एक अभंग तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडला, त्याचे संतसाहित्य अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी केलेले हे निरूपण. त्यातून महाराजांच्या व्यक्तिमत्वातील साहित्य प्रतिभेचा पैलू अधिक उजागर होतो-

********

छत्रपती शिवाजी महाराजांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व त्यांचे कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहे. पण त्याच्या मनात एक कवीही लपलेला होता. हे तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडलेल्या एका अभंग रचनेतून स्पष्ट होते. अशा त्याच्या अजूनही काही रचना मिळू शकतात. त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. तंजावर येथे सापडलेल्या अभंगाबद्दल निरूपणकार डॉ. देखणे यांचा विशेष लेख

आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष म्हणून छत्रपती शिवरायांचे मोठेपण अनन्यसाधारण असे आहे. लोककल्याणकारी राजा, प्रजाहितदक्ष राजा, सामान्यांच्याही मनात स्वराज्याची अस्मिता चेतविणारा राजा, भविष्याचा वेध घेत दूरदृष्टीने पाऊले टाकणारा द्रष्टा राजा, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही चारित्र्याचा महान आदर्श उभा करणारा राजा अशा विविधांगाने छत्रपतींचे व्यक्तिमत्व आदर्शवादी ठरले आहे. आदर्श राजा कसा असावा हे सांगताना एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे,

दाक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


एकता , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.