अंक - स्त्री, ऑगस्ट, १९३५ रुढींचा जन्म एका विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट गरजेपोटी होत असतो. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही धर्मात स्त्रीकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनात फार काही फरक नव्हता. परंतु स्वभावतःच लवचिक असल्याने काळाच्या ओघात हिंदू धर्मातील बहुसंख्य समाजात स्त्रीला पुरूषांच्या बरोबरीने समजले जाऊ लागले. काहींना ते मनातून मान्य नसले तरी समाजाच्या रेट्यापुढे ते स्वीकारावे लागले. मुस्लिम धर्मातील बहुसंख्यांनी मात्र आजही ते स्वीकारलेले नाही. सुशिक्षित स्त्रियांना सुध्दा गोषाची सक्ती केली जाते. ही सक्ती स्त्रियांना मान्य आहे असा देखावाही केला जातो. परंतु काही सुधारणावादी मुस्लिम गेली अनेक वर्ष विविध प्रकारे या विरोधात एल्गार पुकारत आहेत. स्त्रियांच्या समाजातील, कुटुंबातील स्थानाची मोकळेपणी चिकित्सा करणाऱ्या 'स्त्री' या मासिकाच्या १९३५ सालातील ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या लेखात हसत खेळत, मार्मिकपणे या गंभीर विषयाला मुस्लिम समाजातीलच एका लेखकाने हात घातला आहे. महंमद फारुक खान यांचा हा लेख नर्मविनोदी भासत असला तरी त्यातली सल खोलवरची आहे. अशा लेखांमुळे आणि प्रयत्नामुंळेच परंपरांना थोडेफार तडे जाऊ शकले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
नीलिमा
7 वर्षांपूर्वीआजच ट्रिपल तलाकला गुन्हा ठरविणारा अध्यादेश आलाय. मुस्लिम महिलांना नक्कीच मोठा दिलासा.
avthite
7 वर्षांपूर्वी1935 सालाच्या मानाने लेख बराच आधुनिक वाटला. परंतु वेगळे आश्र्चर्य याचे वाटले की मुस्लिम मुलांनासुद्धा इतके शिष्ठाचार शिकवले जात होते?
manjiriv
7 वर्षांपूर्वीआता परिस्थिती बदलली असावी का?
Aashokain
7 वर्षांपूर्वी१९३५ ते २०१८! बाह्यस्वरूपात फरक पडला. पण धर्म म्हटल्यावर, तो कोणताही असेना का, मानसितता अजून तशीच राहिली आहे, स्त्रीयांच्या बाबतीत. महाराष्ट्राचे भाग्य की आपल्याकडे निदान स्त्री शिक्षणाचे महत्व जाणणारे, त्यांच्यासाठी जिवाचे रान करणारे नरवर जन्मले. ज्यानी उभे आयुष्य स्त्री शिक्षणार्थ वेचले! पण मानसिकतेतील बदलाचे काय? मानसिकतेतील प्रगती धर्मागणिक वेगवेगळी होते आहे हे मान्य. काही धर्मीय पुढची वाट पुसताहेत तर कोणी रूढींच्या नावाखाली स्त्रीयांना व पर्यायाने त्या समाजाला धर्माच्याा नावावर मागे रेटण्याचा प्रयत्न करताहेत. असे लोक सर्व घर्मातच आहेत. त्याला कोणताही धर्म अपवाद नाही! सर्वंकश, सर्वसमावेशक विचारधारा समाज मान्य होईल तो सुदिन! नाहीतर 'यत्र नार्यंतु पूज्यते.......' आहेच, तोंडी लावण्यापुरते, पुरोगामी सिद्ध करण्यापुरते!
varshagokhale
7 वर्षांपूर्वीआपल्या रूढी परंपरांचे समर्थन ऐकले होते त्या समाजाकडुन! पहिल्यांदा हे वाचले!
padmakarhade
7 वर्षांपूर्वीलेख वाचून मला , मी सौदी अरेबियात ४ वर्षे राहिले होते ,त्याची प्रकर्षाने आठवण झाली. स्रियांच्या स्थितीचे वर्णन , मी प्रत्यक्ष पाहिले आहे, काही प्रमाणात अनुभवले आहे.बुरखा घातला आहे . ते सर्व अनुभव मी माझ्या “ सौदीच्या अंतरंगात “(ग्रंथाली प्रकाशित) या पुस्तकात लिहिले आहेत.
shashi50
7 वर्षांपूर्वी35 वर्षांपूर्वी एव्हडे निर्भीडपणे लिहिणे हे आश्चर्यच आहे ! कारण आजही सो कोल्ड शिक्षित मुस्लिम तरुण हा परंपरावादीच / कडवाच असतो . चौदाहवी का चांद किंवा मेरे महेबूब सारख्या सिनेमातून खरतर प्रच्छन्नपणे गोशा या चालीरितीवर टिकाच केली आहे ( गैरसमज वगैरे ) पण अगदी आत्ताआत्तापर्यंत ईदच्या दिवशी हा मुस्लिम समाज झुंडीने हे किंवा पाकिजा सारखे चित्रपट पहायला सिनेमागृहाकडे पाळायचा ! त्यांना वाटायचे ये हमारा बिरादरीका सिनेमा है !! अजूनही ट्रिपल तलाक किंवा हलाल सारख्या रानटी प्रथांचे बरेच तरुण समर्थन करतात . त्यांच्यात सुधारणा व्हायला खूप काळ जावा लागेल ! मीना प्रभू जेंव्हा इजिप्तच्या दौऱ्यावर गेली होती तेंव्हा कैरोत मोठ्या सरकारी अधिकार्याच्या घरी उतरली होती, ते रमझानचे दिवस होते आणि घरातील सर्व स्त्री पुरुष -उच्च शिक्षित उच्छभ्रु वगैरे , सात स्वर्ग वगैरे कल्पनांवर विश्वास ठेवणारे होते याचे तिला कमालीचे आश्चर्य वाटले असे लिहिले आहे ! असो !!
gondyaaalare
7 वर्षांपूर्वीआपल्या समाजातील चुकीच्या वाटणाऱ्या चालीरीतींबद्दल ८०-८२ वर्षापूर्वी इतक्या निर्भीडपणे लिहीणा-याचे व ते छापणा-या स्त्री च्या तत्कालीन संपादकाचे अभिनंदन करायला हवे .
vilasrose
7 वर्षांपूर्वी१९३५ साली हा लेख प्रसिद्ध झाला.त्यावेळची मुस्लीम स्त्रीयांची परीस्थिती अत्यंत दयनीय होती.आज ८३ वर्षांनंतर बहुसंख्यमुस्लीम स्त्रीया शालेय शिक्षण तरी घेत आहेत.बुरख्यातून त्या बाहेर पडल्या तरच त्यांची व समाजाचीही प्रगती होईल.