पठित आणि कलावन्त

पुनश्च    शंकर साठे    2020-12-02 06:00:03   

अंक  :किर्लोस्कर मासिक,  डिसेंबर १९३१

नावापुढे एक दोन अक्षरे जोडण्याचा अधिकार विद्यापीठाने देण्यापूर्वीच मी प्रौढविद्यालय सोडले व आधुनिक तरुणांना पाठशालोत्तर ज्या कर्तव्याला लागावे लागते त्याच सेवाप्राप्तीच्या कर्तव्याला मी लागलो. सकाळी टाइम्स नाहीतर क्रॉनिकल चाळावयाचा, ‘पाहिजे’ या सदराचे पारायण करायवयाचे, दहा-वीस अर्ज लिहावयाचे, नित्याचेच कपडे. पण चापचूप अंगी बसवायचे व ‘आपला अति आज्ञाधारक सेवक’ अशा अंतेवचनाची ती लाचार पत्रे काखोठीला मारून सकाळी टेहेळलेल्या त्या दहावीस कचेऱ्यांतल्या दहा-वीस साहेबांची दर्शने घ्यावयाची. कुठे केवळ वाटण्याच्याच अक्षता तर कुठे “बाहेरची ‘जागा भरली’ ही पाटी दिसली नाही का? तुम्हांला येते काय?” वगैरे वाक्यपुष्पे प्राप्त करून घेऊन संध्याकाळपर्यंत ‘हुश्श हुश्श’ करीत, दैवाला बोल लावत, बेकारीबद्दल विचार करीत, निराश होऊन आप्तजनांच्या घरी परतावयाचे! हा माझा कार्यक्रम चांगला सहा महिने चालला होता. हे सहा महिने कोणाकडे दीनवाणीने याचना करून, कोणाला आप्तत्वाची आठवण करून देऊन, केव्हां घरी भिक्षांदेही मागून असा मी दैन्याने तो काळ घालवीत होतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



चिंतन

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    मस्त...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen