कापलेले पंख माझे...


अंक : श्रावण, मे १९९५

लेखाबद्दल थोडेसे : केवळ २५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा लेख विविध अर्थांनी ऐतिहासिक म्हणाला लागेल. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी १७७० साली पर्वतीच्या पायथ्याशी खासगी प्राणी संग्रहालय स्थापन केले होते. १९५३ साली पुणे महापालिकेने त्याचेच रूपांतर पेशवे पार्क प्राणी संग्रहालयात केले आणि प्राण्यांची संख्या वाढवली, विस्तार करत पक्ष्यांनाही तिथे पिंजराबद्ध केले. आपल्या अनेक प्रकल्पांचे जे होते तेच पुढे या पार्कचेही झाले आणि त्याला अवकळा प्राप्त झाली., त्याचेच गंभीर आणि गंमतीदार चित्र प्रस्तुत लेखात रेखाटलेले आहे. खंत व्यक्त करतानाही, गांभीर्य कमी होऊ न देता कशी गंमत करता येते. याचे हा लेख उत्तम उदाहरण आहे.

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर काही वर्षांनी पेशवे पार्कचे रुपांतर एनर्जीपार्कमध्ये झाले. १९९७ ते २००२ या काळात येथील सर्व प्राण्यांचे, नव्याने स्थापन झालेल्या राजीव गांधी झूऑलॉजीकल पार्कमध्ये स्थलांतर केले गेले. या लेखातील शेरेबाजी त्यामुळेच ऐतिहासिक म्हणावी लागेल.

.........................

आपण पेशवे पार्क प्राणीसंग्रहालयातील (अ) व्यवस्थेची  माहिती घेत आहोत. या पेशवेपार्काचा हेतू लोकांना प्राणी दिसावेत व त्यांची माहिती व्हावी असा असावा. म्हणजे आतील काही पिंजऱ्यांवर तसे माहितीचे फलक आहेतही. पण त्यातील नव्वद टक्के फलक तर आजही ‘वाईल्डली’ लावलेले आहेत असे दिसेल.

याच दुर्व्यवस्थेत अडकलेला एक पिंजरा आहे. एक पिंजरा म्हणण्यापेक्षा छोटे कैदखाने आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि या पिंजऱ्यांमध्ये काय असेल सांगा बरे? सात असे जीव आहेत, की ज्यांनी फार पूर्वीपासून मानवाचे मनोरंजन केले, ज्यांना मानवाने जमेल तेव्हा मारले, कधी नेमबाजी दाखवायला तर कधी क्षुधा भागवायला. ज्यांना पाहून मानवाला आकाशातून भराऱ्या मारण्याची कल्पना सुचली आणि आज ते आहेत म्हणूनच आपणही व्यवस्थित जगत आहोत! ते जीव म्हणजे पक्षी! या उद्यानाचे नाव जरी पेशवे उद्यान प्राणी संग्रहालय असले तरीही या ‘प्राणी’ संग्रहालय नामक जेलमध्ये हे ‘पक्षी’ गटातील उडते कैदी सुद्धा ठेवले आहेत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


श्रावण
पर्यावरण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen