पॉइन्ट टू टू


अंक : अंतर्नाद, मे २०१२

लेखिका : रोहिणी भट - साहनी

माझा एक मित्र आहे. म्हणजे तसे मला मित्र-मैत्रिणी आहेत दोन-चार. पण ही गोष्ट या विशिष्ट पर्टिक्युलर मित्राविषयी आहे. या मित्राकडे एक गन आहे. चांगली पाच फूट बंदूक. तिला पॉइन्ट टू टू असं नाव आहे. त्या बंदुकीचा परवाना त्याच्याकडे आहे. तो परवाना दरवर्षी पोलिसांत जाऊन रिन्यू करायचा असतो म्हणे.

तर तो मित्र मला म्हणतो कसा, ‘‘तू मला पोलीस कमिशनरच्या कॅम्पमधल्या मुख्य कार्यालयात घेऊन जाशील का एक दिवस काढून? काय आहे... माझ्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे. पण ड्रायव्हिंगचं लायसन्स नाही ना!’’ मग मी म्हणाले, ‘‘जा की रिक्षा करून.’’ तर तो म्हणतो, ‘‘रिक्षातून बंदूक घेऊन मी कसा जाणार?’’ मी म्हणाले, ‘‘काय झालं त्याच्यात? लोकं बॉम्बसुद्धा रिक्षात घालून घेऊ जातात. तुझ्याकडे तर फक्त बंदूक आहे. ती पण लायसेन्सवाली. मग तू इतका कशाला घाबरतोयस?’’ पण नाही. तो मित्र काही ऐकायलाच तयार नाही. सारखं ‘‘कसा जाऊ, कसा जाऊ! आजकाल लायसेन्स एक्स्पायर झालं, तर किती लफडं होतं, तुला माहीत नाही’’ वगैरे वगैरे. मी म्हणाले, ‘‘काय रे, तुझ्याकडे ही टू टू आली कुठून?’’ म्हणजे एक्झॅक्टली असं, की कुणाकडे तरी बंदूक - ती पण लायसेन्ससकट - अशी मुळात असते तरी कशी? (आणि याला एक्झॅक्टली काय करावं लागतं?)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , ललित
अनुभव कथन

प्रतिक्रिया

 1. shubhangi kadganche

    8 महिन्यांपूर्वी

  मजा आली वाचायला

 2. Shreekrushna Manohar

    9 महिन्यांपूर्वी

  व्वा छान लेख, पोलीस स्टेशनचा अनुभव नमुनेदार .

 3. Asmita Phadke

    9 महिन्यांपूर्वी

  mastch !!!

 4. atmaram jagdale

    9 महिन्यांपूर्वी

  खुपचं वेगळ्या विषयावरचा चुरचुरीत लेख . मिश्किल शैलीत लिहिलेला . आवडला :वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen