कथा : आयुष्याचा हिशोब

पुनश्च    वसंत काळे    2021-03-17 06:00:01   

 मूळ शीर्षक-हिशोब

अंक – ललना, ऑगस्ट १९५९

गोष्टीची सुरुवात होताना असं वाटतं की हे एक गंमतीदार व्यक्तिचित्रण असावं. अवघ्या काही ओळीनंतर ही गोष्ट आपल्याला  कासाविस करु लागते आणि एका भावनिक प्रवाहात आपल्याला वाहून  सोबत घेऊन जाते. १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या या कथेचे लेखक म्हणून नाव आहे, वसंत काळे. 'वपुं'खेरीज आणखी कोणी वसंत काळे नावाचा लेखक असल्याचे ऐकिवात नाही. शिवाय या गोष्टीची शैली तंतोतंत वपुंचीच आहे. सहज बोलता बोलता काळजाला हात घालणारी.  वर्षांचं गणित मांडलं तर ही गोष्ट प्रसिद्ध झाली तेंव्हा व.पु. काळे यांचं वय असेल २७ वर्षे. म्हणजे पुढे  जवळपास चाळीस वर्षे वपुंनी जे काही लिहिलं त्यांची शैली तरुणपणातच आकाराला आलेली होती. वाचा आणि अनुभवा. वसंत काळे नावाचा अन्य कोणी कथाकार माहिती असेल तर तेही आम्हाला कळवा.  

लेखक – वसंत काळे

लता मंगेशकरला तिच्या आजपर्यंत किती रेकॉर्डस् निघाल्या ते माहित नसेल, किंवा एखाद्या प्रथितयश लेखकाला त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कथांचा, लेखांचा आंकडा सांगता येणार नाही, पण आमचे मालक श्री. बाबा दिवाण—वय वर्षे ७२—ह्यांना त्यांच्या दुकानांत औषधाच्या बाटल्या किती आहेत ते विचारा. ‘मेडिकल न्यूज’चा अंक क्षणभर नजरेपासून दूर करतील, चष्म्यांतून तुमच्याकडे रोखून पाहतील, आणि अगदी आत्तां—होय आत्ता—सांगतील,

“१५९८ देशी, ४५१७ विदेशी, संध्याकाळी दोनशेचं पार्सल येणार आहे ते निराळं.”

—नंतर ते पुनः थांबतील, तुम्ही फाजील चौकशा करणारं गिऱ्हाईक आहांत का खरोखर कांही विकत घ्यायला आलेले गृहस्थ आहांत हे ते पाहतील. तुम्हांला ते ओळखतील. त्याने ते समजेल. चाळीस वर्षांचे आडाखे आहेत, चुकायचे नाहीत सहजासहजी. तुमचा अंदाज घेऊन झाल्यावर ते शांतपणे विचारतील,

“आपल्याला काय हवं आहे?”

तुम्ही औषधाचं नांव सांगाल. तेवढ्याच शांतपणे ते माझ्याकडे वळून म्हणतील,

“चोवीस नंबर कपाट. वरून पांचवा कप्पा. उजव्या हाताच्या बाजूला १५ वी बाटली.”

एवढ्यावर ते थांबतील तर ठीक. पण ते थांबायचे नाहीत. त्याची किंमत त्यांच्या जिभेवर असेल. कोणच्या कंपनीचा माल आहे ह्याची माहिती एवढ्याशा डोक्यांत असेल आणि औषध केव्हांपासून दुकानांत ठेवलं आहे त्याची तारीख डोळ्यासमोर असेल.

—तप आहे. तप आहे. मी त्याला साधनाच म्हणतो!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , ललना
कथा

प्रतिक्रिया

  1. Jayendra Palande

      4 वर्षांपूर्वी

    वयाच्या चाळीशीत ऑडिओ कॅसेट च्या जमान्यात वपुंचे कथाकथन खूप ऐकले, वाचनाची आवड असतानाही मासिकांतील कथा वाचण्याचा योग आलाच नाही, आज ही कथा वाचुन वपुं च्या लेखनाची जादू पुन्हा अनुभवली. धन्यवाद बहूविध

  2. Gaurav Bonde

      4 वर्षांपूर्वी

    अत्यंत भवनिक आणि तेवढेच वाईट

  3. Gaurav Bonde

      4 वर्षांपूर्वी

    अत्यंत भवनिक आणि तेवढेच वाईट

  4. Gaurav Bonde

      4 वर्षांपूर्वी

    अत्यंत भवनिक आणि तेवढेच वाईट

  5. Anant Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    ही कथा व पु काळे यांचीच आहे. सुरुवातीस ते वसंत काळे या नावानेच लिहीत असत. प्रसाद सुषमा अनुराधा ई. मासिकातले लिखाण वसंत काळे या नावाचे आहे. त्यांचे व पू कधी झाले हे मात्र सांगणे कठीण. झपूर्झा मधे राहायला जाण्यापूर्वी ते दादर येथे गोकुळ निवास मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत असत.रानडे रोडवर.

  6. Sudhakar Watwe

      4 वर्षांपूर्वी

    कथा खूपच भावनिक आहे.आवडली.

  7. Akash Thele

      4 वर्षांपूर्वी

    ही कथा बहुतेक अगोदर एकदा वाचलीय पण तरी त्यातली जादू काही कमी होत नाही! वपु इस ग्रेट!

  8. Saurabh Dusane

      4 वर्षांपूर्वी

    वपुंची अनेक पुस्तके आणि लेख वाचली आहेत त्यांच्या लेखनाची शैली नेहमीच उत्तम राहिलेली आहे . उत्तम लेख ????thanx to punashcha



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen