अंक : मौज दिवाळी २००८
लेखाबद्दल थोडेसे : 'रिपोर्ताज' हा एक अत्यंत टोकदार परिणाम साधू शकेल असा लेखनप्रकार आहे. पत्रकारिता आणि ललित लेखन या दोन वृत्तींचं योग्य मिश्रण झालं तर उत्तम रिपोर्ताज होतो. एखाद्या प्रसिद्ध परिसरात, घटनास्थळी जाऊन तेथील सविस्तर वृत्तांत टिपण्याची एक पद्धत म्हणजे रिपोर्ताज. वाराणसी म्हटले की एक धार्मिक असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. त्या चित्राच्या आत जाऊन, श्रद्धेचा बुरखा बाजूला ठेवून पाहिलं तर काय दिसतं याचं अत्यंत जीवंत असं चित्र निळू दामले यांनी या लेखात उभं केलं आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लेखनाचा आदर्श नमूना म्हणून या लेखाकडे पाहता येईल. निळू दामले हे जगभर भटकणारे, अत्यंत लक्षपूर्वक जागतिक घडामोडी टिपणारे आणि अंतर्बाह्य भारत माहिती असणारे व्यासंगी पत्रकार-लेखक आहेत. त्यांच्या या सर्व गुणवैशिष्ट्यांचा परिचय या दीर्घ लेखात होतो-
********
वाराणसी हा एक फक्कडपंथी लोकांचा क्लब आहे. हजारो वर्ष जुना क्लब. क्लब म्हटला म्हणजे त्या क्लबचे नियम असतात, काही अटींवरच माणसांना तिथे प्रवेश असतो. म्हणजे काही क्लबांत फक्त सूट घालणाऱ्या लोकांना प्रवेश असतो, काही क्लबांत पायात बूट घालावे लागतात वगैरे. वाराणसी क्लबच्याही अटी आहेत. त्या अटी जे पाळतात तेच वाराणसीचे खरे रहिवासी होऊ शकतात.
वाराणसी.
मी अस्सी घाटाकडे निघालो होतो. तिथे गंगेच्या काठावरच्या एका हॉटेलात मी उतरलो होतो.
अस्सी घाट असं नाव कां पडलं? असी म्हणजे तलवार. गंगेचा वाराणसीमधला प्रवाह तलवारीसारखा बाकदार आहे. त्यातलं अस्सी घाटाजवळचं वळण जरा जास्तच बाकदार असल्यानं घाटाच्या त्या भागाला ‘अस्सी घाट’ म्हणतात. हा टोकाचा घाट आहे. त्यानंतर काशी संपते.
रस्ता अरुंद. एक ट्रक गेला तरी रस्ता बंद होतो.
खड्डे. खड्ड्यांमधे आकाराची किंवा जागेची कोणतीही नियमितता नाही. मधोमध, दोन्ही कडेला. रस्त्यावर खड्डे. चार इंच ते फूटभर खोल. काही खड्डे कोरडे. त्यांतून वहान गेलं की धूळ-माती उडे. काही खड्डे काळ्या पाण्यानं म्हणजे सांडपाण्यानं भरलेले. वाहन त्यातून गेलं की वाटसरूंच्या अंगावर पाण्याचा फवारा. एका खड्ड्यात स्वच्छ पाणी. बहुधा पालिकेचा पाण्याच नळ त्या खड्ड्यात फुटला असावा. तिथं लोकांच्या अंगावर शुद्ध पाणी उडे. टॅक्सी खड्डे चुकवत चालली होती. काही खड्डे चुकवण्यात अर्थ नव्हता; कारण खड्डा चुकवण्यासाठी टॅक्सी डावीकडे किंवा उजवीकडे घेतली तर दोन्ही बाजूंना सांडपाण्याचे सांडवे. सांडपाणी किती खोल आहे ते कळत नसल्यानं रस्त्यावरचे खड्डेच त्यांतल्या त्यात सुरक्षित असा विचार करून टॅक्सीवाला त्या खड्ड्यांतूनच गाडी नेत होता. खड्ड्यांचा टॅक्सीच्या वेगावर काहीही परिणाम होत नव्हता. हायवेवर चालवावी तसा ड्रायव्हर गाडी चालवत होता. वाटाते येणारी माणसं, वाहनं यांना खच्चून शिव्या घालत होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीसुंदर शब्द चित्र!
Amol Suryawanshi
4 वर्षांपूर्वीसुंदर... निरीक्षण शक्तीला दाद...
Renkoji Dahe
4 वर्षांपूर्वीसंपूर्ण लेख वाचला..प्रत्यक्षात मात्र समोर एखादी फिल्म सुरू आहे आणि समोर दिसणा-या दृश्यांबरोवर निवेदन (narration) सुरू असल्याचा शेवटपर्यंत भास होत होता..समोरून चित्रफित सरकतेय आणि सोबत अप्रतिम पटकथेचे वाचन..! अतिशय प्रसन्नता वाटली..फक्कडपंथी वाराणसी..!!✍
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीअतिषय छान - चित्रमय वर्णन असलेला लेख : लेखात आलेलं वर्णन प्रथमच वाचायला मिळाले . एका वेगळ्या स्थळाची ओळख झाली :