" हिंदू समाज अखंड राहिला पाहिजे अशी गांधींची अढळ भूमिका होती. आणि त्याचप्रमाणं देश अखंड राहिला पाहिजे अशीही त्यांची भूमिका होती. पाकिस्तानच्या निर्मितीत गांधींचा हात होता असं जे लोक म्हणतात ते केवळ अज्ञानानं तसं म्हणतात. लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना पुढं मांडली तेव्हा काँग्रेसपुढं दोन मार्ग होते : फाळणीला मान्यता देऊन स्वातंत्र्य पदरात पाडून घ्यावं किंवा फाळणी नाकारून स्वातंत्र्य कितीही लांबलं तरी हरकत नाही असे म्हणावं. फाळणीसह स्वातंत्र्य हवं की पारतंत्र्यासह देशाचं अखंडत्व हवं असा सवाल होता. गांधीजी सतत सांगत राहिले की, देशाच्या फाळणीला मी कधीही संमती देणार नाही.... त्यांच्या ठिकाणचा राजकारणी पुरुष आणि शांतिदूतत्व करणारा साधुपुरुष या दोघांत पूर्वी कधी नव्हे असा झगडा या वेळी उत्पन्न झाला. आणि या झगड्यात साधुपुरुषाचा विजय झाला....फाळणीला मान्यता न दिल्यास स्वातंत्र्य लांबेल, मग पुढं काय करायच या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ गांधींवर आलीच नाही. कारण त्यांच्याखेरीज बाकीचे सर्व पुढारी फाळणीसकट स्वातंत्र्य स्वीकारण्यास उतावीळ झालेले त्यांना दिसले, आणि ते पाहिल्यावर गांधी त्यांच्या वाटेतून दूरच झाले.... गांधीनी देशाच्या प्रत्यक्ष फाळणीला मान्यता दिली नाही. केवळ आपल्या हट्टासाठी भारतीय स्वातंत्र्याचा दिवस लांबू नये एवढ्याकरिता राजकारणी पुरुष या नात्यानं त्यांनी एक प्रकारे आत्महत्याच केली....
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jitendra Dorle
4 वर्षांपूर्वीमहात्मा गांधींबद्दल खुपच छान लिहिले आहे
Diwakar Ganjare
4 वर्षांपूर्वीभारतात महात्मा गांधींसारखा युगपुरुष झाला नसता तर देशाचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही . . . कट्टरपंथी हिंदु महासभा, संघ आणि मुस्लिम लीग यांनी शेवटी डाव साधलाच हे आपलं दुर्दैव . . . विचार करायला लावणारा सुंदर लेख. धन्यवाद.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीमहात्मा गांधी यांचे बद्दल लिहीलेले व मी वाचलेले आजपर्यंत चे सगळ्यात भावलेले लिखाण.