बागलांची राई


अंक : सत्यकथा, ऑगस्ट, १९७६

लेखाबद्दल थोडेसे : खानोलकरांना गुढत्वाचं मोठं खोल आकर्षण होतं. त्या गुढत्वात माणसाचं अस्तित्व शोधण्याची त्यांची शैलीही तेवढीच गुढ,तरल होती. खानोलकरांचे आजोबा म्हणजे धोडू यशवंत बागलकर यांच्या राईत असलेला मठ, त्या मठातील समाधीभोवतीचा ओलसर अंधार, बाजूचा पिंपळ या सर्वांनी एकत्रितरित्या खानोलकरांच्या उमलत्या वयावर गारुड केलं होतं. त्या गारुडाचं शब्दांत केलेलं हे वर्णन आहे. ते वाचता वाचता  सरसरुन अंगावर काटा उभा राहतो, पण तो भयाचा नसतो..तो असतो एका गुढ अस्तित्वाला स्पर्श केल्याच्या भावनेचा. १९७६ सालच्या ऑगस्ट महिन्याच्या 'सत्यकथाम'ध्ये हा लेख प्रसिद्ध झाला होता.

मी जो कोणी आज अस्तित्वात आहे—थोडा असा, थोडा तसा वगैरे वगैरे—तो ‘मी’ कसाही असेन. सामान्य-असामान्य, दुष्ट-सुष्ट. त्या ‘मी’चा धागा कुठंतरी आहे. आणि प्रत्येकाच्या मनोव्यापारांची गती ही अशीच असते. त्याच्या आयुष्याच्या रथाच्या चक्रांना कुठूनतरी गती मिळालेली असते. त्या गतीवर त्याच्या जीवनव्यापारांचा गाडा चाललेला असतो. केव्हा केव्हा त्याच्या रथाची चक्रं ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’च्या जीवन-मरणाच्या संघर्षानं चिखलात रुतून बसतात. मग गीता सांगणारा साक्षात श्रीकृष्णही त्या किंकर्तव्यमूढ आत्म्याला वाचूव शकत नाही. कदाचित तोच क्षण त्याच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. पण या सगळ्या संघर्षांना धीरोदत्तपणे सामोऱ्या जाणाऱ्या आणि प्रसंगी पाठ दाखविणाऱ्या या माणसांच्या शक्तीचा, प्रकृतीचा, दौर्बल्याचा आणि विकृतीचा मूलाधार कुठंतरी असतो. मूलाधार आणि मर्मसुद्धा.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


स्थललेख , सत्यकथा , अनुभव कथन
स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. Mohini Petkar

      3 वर्षांपूर्वी

    खानोलकरांच्या लेखनात जी गूढगर्भता आहे ती मला नेहमीच आकर्षित करते. वरील लेख ही असाच अप्रतिम व गूढस्पर्शी आहे.

  2. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम, किती सुरेख व भावूक वर्णन,

  3. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    खानोलकर यांचं लेखन म्हणजे एका झटक्यात समजून येतं नाही, सारखं मागे जाऊन परत वाचावं लागतं. गुढ अर्थ असतो शब्दाशब्दात, वाक्यावाक्यात.

  4. Sandhya Kadam

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख !

  5. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख आहे . खानोलकरांचं कोणतही लेखन मी आवडीनं वाचतोच . खूपच उदभूत - वेगळ्या जगाला स्पर्श करणारं लिहितात ते . आजचा लेख खूपचं सुंदर ! आवडला



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen