अंक : यशवंत, ऑगस्ट १९५१
'गेल्या ७५ वर्षात राजकारण पार रसातळाला गेले, आधी ते मूल्याधारीत होते' असे आपल्याला वाटते ना? मग पहिल्या निवडणुकीच्या वेळी राजकारण आणि निवडणूक याविषयी काही लिहिले गेले होते ते स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी वाचाच! आणि हाच लेख स्वातंत्र्याचे १५० वे वर्ष साजरी करणारी मंडळी आणखी ७५ वर्षांनी वाचेल याचीही खात्री आपल्याला पटेल.
********
कोरियन युद्ध आणि त्या अनुषंगाने तिबेट भागांतील चीनचे आक्रमण गेल्या वर्षी आम्हांस अस्वस्थ करीत राहिले. नेपाळमधील अंतस्थ बंडाळीने काही काल चित्तस्वास्थ्य लाभले नाही. इराण तेल-लढा आपल्या नजीक असला आणि त्याचे अप्रत्यक्ष परिणामच आपणांस जाणवणार असले तरी त्या लढ्याची सूत्रे कम्युनिस्ट पंखाआडून हलविली जात आहेत व सामोपचाराने हा प्रश्र्न न मिटला तर कदाचित् जागतिक लढ्याचाही संभव आहे, ह्या गोष्टी आमच्या राजकर्त्यांस अस्वस्थ करण्यास पुरेशा आहेत. इराणचे नैसर्गिक धन सर्वस्वी त्याच्या मालकीचे असावे, या तेल-खाणीच्या राष्ट्रीयीकरणाचे इराणचे प्रयत्नांस भारताची सहानुभूतिच आहे. पण या राष्ट्रीयीकरणाची स्फूर्ति मुळांतच प्रतिगामी विचारसरणींत आहे ही गोष्ट लक्षांत घेतां भारताला जागरूक राहावयासच हवे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
SHRIPAD GARGE
4 वर्षांपूर्वीगेल्या अनेक वर्षांत आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्या तशाच आहेत, हे सर्वाधिक काळ असलेल्या (म्हणजे काँग्रेस) सरकारचे अपयश आहे. काश्मीर रुपी गळूवर नुकतीच एक चांगली उपाययोजना झाली आहे. पुढील ७५ वर्षांनंतर हा लेख पुन्हा वाचला गेला तर हा एक संदर्भ नक्की बदलला असेल. आशा आहे की इतर संदर्भ देखील बदलतील.
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीत्यावेळच्या परिस्थितीचा संदर्भ त्या लिखाणाला आहे. बदलत्या परिस्थितीतील राजकारणात होणारे मूल्यांचे अधःपतन लेखकाने टिपले आहे. राजकारणात मुळात लोकांचा पाठिंबा,सहभाग व अंतिमतः पडणारी मते यावरच भारतीय लोकशाहीत सत्तागमन अवलंबून असते. तो काळही यास अपवाद नव्हता. पण सत्ताग्रहण सत्ताग्रहणासाठी आजच्यासारखा घोडेबाजार, लक्ष्मीदर्शन व तत्त्वांची पायमल्ली त्यावेळेस नव्हती...