‘सांभाळणे’ या शब्दामागे एक भावना आहे. स्वस्त दरात ‘लॉजिंग बोर्डिंग’ चालवणे हा काही समितीचा मुख्य उद्देश नव्हे. खेड्यापाड्यांतून ही मुले येतात. त्यांच्यावर कुटुंबाप्रमाणे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संस्कार व्हावेत, या दृष्टीने समितीच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सतत चालू आहेत. या कार्याला ‘विद्यार्थी घडवणे’ असे मोठे नाव श्री. अच्युतराव आपटे यांनी किर्लोस्कर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिलेले आढळते, पण कार्यकर्त्यांच्या सहजस्वाभाविक प्रेरणांना व वृत्तींना ‘ध्येयवाद’चे व्यापक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न तितकासा ठीक नाही. समिती आज भल्यामोठ्या एकत्र कुटुंबासारखी वाढते आहे आणि ती तशीच वाढण्यात, वाढू देण्यात नावीन्य आहे, वैशिष्ट्य आहे. विशिष्ट मतप्रणाली किंवा आचारविचारांचा आग्रह धरला, त्यानुरूप संस्कारांसाठी काही विशिष्ट कार्यक्रमांची मांडणी केली, तरच ‘विद्यार्थी घडविणे’ ही क्रिया संभवते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Santosh Waykos
3 वर्षांपूर्वीNice