सन १९१७ पासून तीन वर्षे मी रत्नागिरीस हायस्कुलांत शिक्षक होतो. तेथे टिळकआळीत आमचे पूर्वजगृह आहे. पांडुमास्तर असा नांवाने ओळखिल्या जाणाऱ्या जगन्नमित्राने मला त्या घरांत नेले. आपल्या पूर्वजांचे घर पहावे आणि कुळांतील स्त्री-पुरुषांचे दर्शन व्हावे एवढाच तेथे जाण्यांत माझा हेतु होता. पांडुमास्तर त्या घरांत असणाऱ्या वृद्ध पुरुषाला म्हणाले, “हे जोशी मास्तर हायस्कुलांत नोकरीला आहेत. तुमच्याच कुळांतले आहेत.” मी त्या गृहस्थांस त्यांच्या वंशवृक्षांतील माझी डहाळी दाखवून देतांच त्यांना आनंद वाटण्याऐवजी त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या आणि आम्हांला ते म्हणाले, “मी जरा घरांत जाऊन येतो.”
आम्ही बराच वेळ त्यांच्य परत येण्याची वाट पाहिली. आमच्याकरीतां चहा टाकण्यास सांगायला ते घरांत गेले आहेत अशी आशा आम्हांला वाटत होती. पण पुष्कळ वेळ झाला तरी ते बाहेर येईनात म्हणून पांडुमास्तर घरांत गेले आणि त्यांनी चौकशी केली. “ते तर पागोटं घालून मागल्या दारानं केव्हांच बाहेर गेले!”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीछान