साहब मिले सबूरी में…

ब्रिटनमधील प्रमुख राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळत नसल्याबद्दलची एक बातमी मध्यंतरी वाचनात आली. अर्थात, कार्यकर्त्यांची ही टंचाई केवळ ब्रिटनपुरती मर्यादित नाही. जगभरातल्या सर्वच लोकशाही देशांमधील राजकीय पक्षांपुढे स्वयंस्फूर्तीने काम करणा-या निष्ठावान आणि निरपेक्ष वृत्तीच्या कार्यकर्त्यांचा अभाव हे अलीकडच्या काळातले एक मोठे संकट आहे. भारतातले राजकीय पक्ष हेही याला अपवाद नाहीत.

निवडणुका जिंकून येनकेनप्रकारेण सत्तेवर येणे, एवढा एकच कार्यक्रम झाल्यापासून ‘राजकीय कार्यकर्ता’ नावाच्या संस्थेला कसर लागणे सुरू झाले. राजकारणात अगदी ठरवून, टप्प्या-टप्प्याने ‘करियर’च्या पाय-या चढण्याच्या इराद्याने येणारी मंडळी वगळता, निखळपणे विचारांशी बांधिलकी मानून काम करणारा समूह गेल्या काही वर्षांत आक्रसत गेला आहे. सांप्रतच्या पक्षीय राजकारणात आजमितीस ‘परिवर्तन’ वगैरेची भाषा फारशा गांभीर्याने कोणी वापरतानाही दिसत नाही.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 4 Comments

 1. ganeshmaali

  खूप छान.. लिहिलं आहे. कोणीतरी यावर लिहिता आहे हेच खूप महत्वाचं आहे. विनयजी खरोखर चे कार्यकर्ते आहेत. मला तर दिसत आहे कि आता कार्यकर्ताच बनायचं नाही आहे कुणाला .. आणि पालकांना तर अजिबातच वाटत नाही कि आपल्या पाल्याने असा काही करावे.. बहुतांश पालकांचा भर आपला पाळ्या कसा चांगली नोकरी मिळवून settle होईल याकडेच आहे. मग कार्यकर्ता समाजासाठी काही करणारे लोक येणार कुठून. !

 2. rakshedevendra

  हा लेख पूर्ण एकांगी वाटतो, कारण एका नेत्याच्या अंगाने कार्यकर्ता या भूमिकेकडे पहिले आहे.
  ज्याचा राजकीय, सामाजिक अशा कोणत्याही चळवळीशी संबंध नाही पण जो सुजाण नागरिक आहे त्याला कार्यकर्ते या जमातीबद्दल काय वाटते हे पण पहिले पाहिजे.
  तिसरा वर्ग आहे तो खुद्द कार्यकर्ता, त्यातही दोन प्रकार – एक निरपेक्ष आणि दुसरा सहेतुक.
  या चार अंगाने यावर विचार झाला असता तर हा लेख परिपूर्ण ठरावा.
  कोणी वाचक यातली एक एक भूमिका घेऊन यावर लिहू पाहत असेल तरी देखील ते स्वागतार्हच ठरावे.
  चारही बाजूंचे चार आणि एक सामालोचक असे एकंदर लिखाण वाचायला मिळाल्यास ते उत्तम.

 3. Govind Godbole

  Good experiment

 4. Shaileshnipunge

  अत्यंत महत्वाचे विचार माननीय विनय सहस्त्रबुद्धे सरांनी मांडलेले आहेत, संस्था , संघटन यामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याने मन लावून हे वाचले पाहिजेत आणि त्यावर मनन केले पाहिजे. सुदैवाने मागील वर्षभरात माननीय विजयजी यांच्या बरोबर काही काम कण्याची संधी मिळाली, त्यांना जवळून पाहता आले. त्यांची काम करायची शैली, विचारातील स्पष्टपणा, आणि या सगळ्याला असलेले साधेपणाचे कोंदण. यामुळे आज देखील माननीय विनयजी इतक्या मोठ्या जबाबदारीच्या पदांवर काम करत असताना देखील अत्यंत जवळचे वाटतात. ह्या नम्रपणा मध्येच एक मोठा कार्यकर्ता दडलेला आहे.

  हा लेख प्रसिद्ध केल्या पद्दल पुनश्च चे देखील मनापासून आभार.

  शैलेश निपुणगे

Leave a Reply