"काय? पुनः पत्र? आणि तेही शकूचं? हा गोंधळ आहे तरी काय? हल्ली हे काय चाललं आहे? आपल्या नवऱ्याकडे इतक्या स्त्रिया आणखी इतकी गुप्त पत्र येतात तरी कसली?" झाले; कमलाबाईंच्या डोक्यांत संशयाने पुनः थैमान घातले. नवरा अद्याप घरी आला नाही तो आपणच ते पत्र घेऊन फोडून वाचले तर? खुद्द पत्नीस तसे करण्यास काय हरकत आहे? त्यांनी लागलीच निश्र्चय केला; व गड्याकडून “मी तें देतें” असे म्हणून पत्र मागून घेतलं. गड्यलाही संशय येण्याचे कांहीच कारण नव्हते, ते पत्र घेऊन त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी फोडले. पाकिटावर पत्ता नव्हताच. अंत चार पांच ओळीचे पुढील पत्र होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .