तसे टायपिंगचे कसब केशवराव यांच्या अंगी आहे. काँग्रेसपत्रिकेची छपाई त्यांच्या घरांत मिळालेल्या त्यांच्या मालकीच्या यंत्रावरच करण्यांत आली, असे स्पष्टपणे शाबीत होत आहे. या यंत्रातील कित्येक अक्षरे झिजली आहेत; कांही अक्षरे वाकडी झाली आहेत व या यंत्रात कित्येक असे विशेष प्रकार आहेत की, ते फक्त त्या यंत्रापुरतेच आढळतात. काँग्रेसपत्रिकेच्या छपाईत याच झिजलेल्या ठशांवरील अक्षरे आहेत. हीच वाकडी अक्षरे उमटली आहेत व त्या छपाईत याच यंत्रांतील दोष आहेत. त्यावरून काँग्रेसपत्रिकेची छपाई व प्रती करण्याचा मेणकागद याच यंत्रावर छापले गेले आहेत याविषयी मुळीच शंका उरत नाही, असे टायपिंगच्या कलेतील अनुभवी तज्ज्ञांच्या साक्षी वरून सिद्ध होणार आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .