बाळशास्त्री यांच्याविषयीची त्यावेळची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यावरून ते किती विलक्षण बुद्धिमान होते ह्याची सहज कल्पना होऊ शकते. सन १८२४ च्या सुमारास ते प्रथम मुंबईस आले तेव्हां ते एका मोठ्या रस्त्यावर उभे असतांना दोघां गोऱ्या शिपायांची मारामारी झाली व त्यासंबंधीची कोर्टांत फिर्याद दाखल झाली. त्याविषयी झालेल्या चौकशीत या लहान मुलाची (बाळशास्त्री यांची) साक्ष झाली. त्यावेळी त्यांना इंग्रजीचा गंध नव्हता. तरी त्यांनी आपल्या साक्षींत त्या दोन गोऱ्या शिपायांत इंग्रजींत झालेली बोलाचाली वगैरे गोष्टी अगदी बरोबर रीतीने सांगितल्या! त्यावरून न्यायाधीशाला या मुलाच्या स्मरणशक्तीबद्दल मोठे कौतुक वाटले व त्यांनी शिक्षणखात्यांतील मुख्य अधिकाऱ्याकडे त्याची शिफारस केली व त्याप्रमाणे शास्त्रीबोवांच्या इंग्रजी शिकण्याचा योग जमून आला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .