अंक -: नवनीत ( १९६० ) मुंबईचे सुप्रसिद्ध ‘ तांबे-आरोग्यभुवन ’ आणि आता ‘ बी. तांबे लिमिटेड ’ ह्याचे संचालक श्री. काकासाहेब तांबे ह्यांना पाहताच अकबर इलाहाबादीचा हा शेर सहजच आठवतो:- ‘‘लोक कहते हैं, बदलता है जमाना सबको, मर्द वह है, जो जमाने को बदल देता है.’’ (लोक म्हणतात, काळ सर्वांनाच बदलतो, पण काळाला जो बदलतो तोच खरा पुरुष होय.) काकांनी राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाची कसलीही युगक्रांती केली नाही हे जरी खरे असले तरी बालपणापासून झगडत राहून अखेरीस त्यांनी आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण केली हेही तितकेच खरे आहे. खरे पाहिले तर श्री. वा. वि. ऊर्फ काकासाहेब तांबे ह्यांनी इंजिनियर आणि शास्त्रज्ञ होण्याचा प्रयत्न केला पण आयुष्याची सुरुवात शिक्षकाच्या पेशाने करून शेवटी ते शिक्षक न राहता व्यापारी झाले, हा केवढा विरोधाभास आहे! आणि व्यापारीसुद्धा काही बडा नव्हे, ताकासारख्या वस्तूचा! वास्तविक काकासाहेबांनाही माहीत नव्हते की पहिल्या दिवशी, म्हणजे ४ मार्च १९२६ रोजी, केवळ आठ आण्याची विक्री होणारे आपले दुकान पुढे इतके व्यापक स्वरूप धारण करील; त्याच्या शाखा उघडल्या जातील व रोजची विक्री कितीतरी भरपूर प्रमाणात होऊ लागेल. पुढे मुंबईतील अनेक उपाहारगृहांवर ‘आरोग्यभुवन’ अशा पाट्या लागतील अशीही त्यांनी कल्पना केली नव्हती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Akash Pawar
7 वर्षांपूर्वीIntrested to read these type of stories...