या स्वप्नाचा अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ व्हिएन्ना येथील प्रोफेसर फ्रूड हा होय. याने या विषयाचा पुष्कळ वर्षे अभ्यास करून आपला पहिला ग्रंथ सन १९०० साली प्रसिद्ध केला. सदर ग्रंथाचे बहुतेक सर्व युरोपियन भाषांत भाषांतर झाले आहे. फ्रूडचे म्हणणे असे होते की, मनु,याच्या मनांत शेकडो इच्छा उत्पन्न होत असतात. यांपैकी कांही इच्छा अगदी दुष्प्राप्य असतात. व कांही नैतिकदृष्ट्या अथवा सामाजिक दृष्ट्या अयोग्य असतात. या अयोग्य व दुष्प्राप्य इच्छा दाबून टाकण्याचा मन नेहमी प्रयत्न करीत असते व त्या अगदी नाहीशा झाल्या असे मनाला वाटते. पण खरोखर त्या अगदी नाहीशा होत नाहीत. त्या अज्ञात मनाच्या खजिन्यांत पडून राहिलेल्या असतात व स्वप्नांत या इच्छा प्रकट होतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .