वैदिक पांडित्याबरोबरच त्यांच्या ठिकाणच्या आधुनिक पांडित्याचें दर्शन जनतेला वेळोवेळी घडलेले आहे. त्यांना इंग्रजी शिकवायला गुरूहि मोठे थोर मिळाले होते. गांधींच्या आश्रमांत त्यांना प्रथम आचार्य विनोबा भाव्यांनी इंग्रजी शिकवले. मात्र त्यांची इंग्रजी भाषेवर इतकी प्रभुता आहे की, त्या परकीय भाषेंत ते तासन्तास व्याख्यान देऊ शकतात! भौतिकवाद व मार्क्सवादाचें आधुनिक सर्व तत्वज्ञान त्यांनीं स्वतंत्रपणें स्वतः अभ्यासले आहे. त्यानंतर त्यांचा भाई मानवेंद्रनाथ रॉय यांच्याशी संबंध आला. हिंदुस्थानच्या राजकीय क्षेत्रांत विख्यात क्रांतिकारक व तर्कशुद्ध विचारसरणीबाबत व नव्या मानवतावादी धोरणाबाबत प्रसिद्ध असलेले नेते श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रत्यक्ष पदार्पणानंतर त्यांच्याकडे अनेक बुद्धिवंत व प्रामाणिक राजकारणी पुरुष आकर्षित झाले. त्यांत महाराष्ट्रांत नांव घेण्याजोगा पंडित म्हणून श्री. लक्ष्मणशास्त्री यांचा प्रामुख्यानें उल्लेख करावा लागेल
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .