आजपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासात जर कोणती व्हाइसरॉय आपली कारकीर्द गाजवून गेले असतील तर ते दोनच. एक लॉर्ड लिटन व दुसरे लॉर्ड कर्झन. दोघांनीही हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीची जागृती अर्थात विरोधीभक्तीने करण्याचे श्रेय पदरांत पाडून घेतले. लॉर्ड लिटन यांचे धोरण हिंदी लोकांच्या उन्नतीच्या सर्वथैव विरुद्ध होते. ते कट्टे साम्राज्यवादी असून अत्यंत अनुदार व प्रतिगामी धोरणाचे होते. त्यांच्या आमदानीत व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्टच्या युगाने एतद्देशीय वर्तमानपत्रांचे तोंड बंद झाले. हत्याराच्या कायद्याने गरीब प्रजेस निशस्त्र करण्यात आले. १८३३ व १८५३ सालांत दिलेली अभिवचने गुंडाळून ठेवून इंग्लंडांतील सिव्हिल सर्विस परीक्षेस एतद्देशियांचे बसू देऊ नये अशी शिफारस केली, वरिष्ठ शिक्षणाबद्दल उघड विरोधाचे धोरण स्वीकारले. सरहद्दीवर अफगाणिस्थानशी निष्कारण लढाई सुरू केली, मिठावरील कर वाढविला, अशा एक ना दोन अनेक गोष्टी हिंदी लोकमता विरुद्ध केल्या.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .