१९३० सालची कायदेभंगाची प्रचंड चळवळ सर्वांच्या डोळ्यांपुढची असल्यामुळे त्याबद्दल लिहिण्याची जरूरीच नाही. हिंदुस्थानच्या राजकीय लढ्याचा इतिहास लिहिणाऱ्या भावी लेखकाला या वर्षाचा इतिहास लिहिताना इतिहासाची शास्त्रीय लेखणी दूर ठेवून क्षणभर काव्य देवतेची आराधना करावी लागेल असे अद्भुत बिरसा चे रोमांचकारी प्रसंग या सालात घडून आले. विराट स्वरूपाचे धृतराष्ट्राकडे वर्णन करताना संजयाने जे उद्गार काढले त्याप्रमाणे लोकमताच्या यावर्षीच्या विराट स्वरूपाचे वर्णन “तच्य संस्मृत्य रूपमत्यद्भतं हरेः। विल्मयो मे महानराजन् हृष्यामि च पुनः पुनः।।” असेच नुसते करणे भाग आहे. २६ जानेवारी १९३० रोजी राष्ट्रीय सभेच्या आज्ञेप्रमाणे ठिकठिकाणी ‘ स्वातंत्र्य दिन’ पाळण्यात आला. १२ मार्च रोजी महात्माजींचे सुप्रसिद्ध दांडीचे प्रयाण झाले व मिठाच्या कायदेभंग आस सुरुवात झाली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .